Advertisement

भुजबळांचा मुक्काम अजून ४ ते ५ दिवस केईएममध्येच


भुजबळांचा मुक्काम अजून ४ ते ५ दिवस केईएममध्येच
SHARES

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना शुक्रवारी जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या सुटकेची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण, त्यानंतरही भुजबळ आणखी ४ ते ५ दिवस केईएम रुग्णालयातच थांबून उपचार घेणार आहेत.


कायदेशीर प्रक्रिया पूर्ण

शुक्रवारी जामीन मिळाल्यानंतर सलग दोन दिवस सुट्ट्या असल्यामुळे भुजबळ यांची सुटका होईल का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र, रविवारीच ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांची सुटका होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, सध्या प्रकृती ठीक नसल्याने भुजबळांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे भुजबळ केईएममधून बाहेर येणार नाहीत.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, आणखी ४ ते ५ दिवस भुजबळ केईएममध्येच उपचार घेणार आहेत. त्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात हलवलं जाण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

छगन भुजबळांचा महाराष्ट्र सदन घोटाळा काय अाहे? इथे वाचा


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा