Advertisement

दूध आंदोलकांवर दरोडेखोरांचं कलम नाही - मुख्यमंत्री


दूध आंदोलकांवर दरोडेखोरांचं कलम नाही - मुख्यमंत्री
SHARES

दूध दरावरून राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनातील अांदोलकांवर दरोडेखोरांना लावले जाणारे १५१ (३) हे कलम लागणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना दिली आहे.


शेतकऱ्यांवरील दडपशाही 

पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात अाला. दुधाला रास्त भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी शांततेत आंदोलन सुरू केलं आहे. मात्र त्यांना न्याय देण्याऐवजी सरकार त्यांच्यावर बळाचा वापर करत आहे. अशा आंदोलनांमध्ये निदर्शकांवर साधारणतः १५१ (१) हे कलम लावलं जातं. परंतू, दूध आंदोलकांवर दरोडेखोर किंवा चोरांसाठी वापरले जाणारे स्थानबद्धतेचे १५१ (३)  हे कलम लावले जात आहे. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांवरील दडपशाही अाहे. सरकारने याबाबत तातडीने निवेदन करावे, अशी मागणीविरोधी पक्षनेत्यांनी लावून धरली होती.


मुख्यमंत्र्यांचं निवेदन

याबाबत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन सादर केले. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांवर १५१ (३) हे कलम लावलं जाणार नाही. या आंदोलनात शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे परत घेतले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.



हेही वाचा -

दूध एक्सप्रेस रद्द, मुंबईत येणारं दूध आलंच नाही

'नीट'मध्ये परराज्यातील मुलांवर बारीक लक्ष - राज ठाकरे



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा