Advertisement

मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याने ते होम क्वारंटाइन आहेत.

मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण
SHARES

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याने ते होम क्वारंटाइन आहेत. राज्याचे सचिव म्हणून ते अनेक बैठकांना हजर असतात. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांची चिंता वाढली आहे.

२२ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीला संजय कुमार हजर होते.  दोन दिवसांपूर्वी संजय कुमार यांना सौम्य लक्षणं जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली. ज्यानंतर त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात अनेक मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारीच शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

संजय कुमार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मंत्रालयात विशेष काळजी घेतली जाणार आहे. जून महिन्यात संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली होती. संजय कुमार हे भारतीय प्रशासन सेवेच्या १९८४ च्या बॅचचे आहेत. 



हेही वाचा -

मुंबईतील कोरोनामुक्तांचं प्रमाण ८२ टक्क्यांवर

लाॅकडाऊनचे उल्लघंन केल्याप्रकरणी राज्यात २ लाख गुन्हे दाखल


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा