Advertisement

चिमुकल्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 'अनोख्या' शुभेच्छा

चिमुकल्या चाहत्यानं उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट दिली आहे.

चिमुकल्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 'अनोख्या' शुभेच्छा
SHARES

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. पण कोरोना संकट आणि सध्या कोकणात आलेल्या पुरपरिस्थितीमुळे त्यांना वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या चिमुकल्या चाहत्यानं उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट दिली आहे.

साडे चार वर्षांच्या आयुष कांबळेनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मोझॅक पोर्टेट साकारले आहे. ४ हजार ५०० कागदी फुलांपासून हे पोट्रेट तयार करण्यात आलं आहे. ४ फूट उंची आणि ३ फूट लांबीचे पोट्रेट आहे. पोट्रेट साकारण्यासाठी १२ तासाचा अवधी लागला.


मोझॅक पोट्रेट साकारणारा भारतातील पहिला बालकलाकार अशी उपमा देखील त्याला मिळाली आहे. यासोबतच वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये आयुषनं साकारलेल्या पोर्ट्रेटची नोंद झाली आहे.

या आधीही लॅकडाऊनमध्ये आयुष कांबळे यानं त्याचा मामा आणि कलाकार चेतन राऊत सोबत १४ विश्व विक्रम करणारे मोझॅक पोट्रेट साकारण्यात हातभार लावला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मोझॅक पोट्रेटसाठी देखील त्यानं आपल्या मामाची मदत घेतली.

आय़ुष सध्या यंग फिनिक्स इंटरनॅशनल प्रीस्कूलमध्ये ज्युनिअर के जी मध्ये आयुष शिकत आहे. लहानपणापासून कलाकार चेतन राऊत सोबत काम करून कले विषयाची आवड त्याच्यात निर्माण झाली.हेही वाचा

पवारांमुळे ठाकरे मुख्यमंत्री, तर राष्ट्रवादी कुणाच्या सहकार्याने सत्तेत?

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यात गर्दी मोठं आव्हान- उद्धव ठाकरे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा