Advertisement

चीनकडून ‘या’ मार्गानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह १० हजार देशवासियांची हेरगिरी


चीनकडून ‘या’ मार्गानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह १० हजार देशवासियांची हेरगिरी
SHARES

एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार चीनकडून भारतातील मोठ्या संविधानिक पदांवरील राजकीय नेते तसेच लष्करातील बड्या अधिकाऱ्यांची हेरगिरी सुरू आहे. यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, प्रमुख विरोधी पक्षनेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश यांच्यासह सुमारे १ हजार ३५० लोकांची हेरगिरी सुरू आहे.

चीनकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पाच मंत्री, माजी आणि आजी ४० मुख्यमंत्री, ३५० खासदार, कायदेतज्ञ, आमदार, महापौर, सरपंच आणि लष्करातील काही अधिकारी अशा जवळपास १ हजार ३५० लोकांची हेरगिरी सुरू आहे. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, दिग्दर्शक शाम बेनेगल यांच्यासह देशातील काही पत्रकारांचा देखील समावेश असल्याचं समोर येत आहे.

चीनची शेनझेन आणि झेन्हुआ इन्फोटेक ही कंपनी हेरगिरी करत असल्याची माहिती आहे. शेनझेन इन्फोटेक कंपनी ही हेरगिरी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या सरकारसाठी करत असल्याची माहिती आहे. या कंपनीचं काम दुसऱ्या देशांवर नजर ठेवणं आहे. त्यामुळे फक्त भारतच नाही तर इतर देशांवरही ही कंपनी नजर ठेवून असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

चीनच्या या कंपनीकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, दिल्लीचे उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासह सध्याच्या एकूण २४ मुख्यमंत्र्यांची हेरगिरी सुरू आहे. या लिस्टमध्ये १६ माजी मुख्यमंत्र्यांचा देखील समावेश आहे.



हेही वाचा

उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असेल तर.. राजकीय पक्षांसाठी निवडणूक आयोगाची सूचना

कोरोनाविरुद्ध ‘हाच’ महत्त्वाचा मंत्र- उद्धव ठाकरे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा