आयारामांवर मोठी जबाबदारी, महाडिक, वाघ भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजापात उडी मारणारे कोल्हापूरमधील नेते धनंजय महाडिक आणि चित्रा वाघ यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

SHARE

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजापात उडी मारणारे कोल्हापूरमधील नेते धनंजय महाडिक आणि चित्रा वाघ यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाने या दोन्ही नेत्यांना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त केलं आहे.  

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे. महाडिक कोल्हापूरमधून राष्ट्रवादीचे खासदार होते. परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तर चित्रा वाघ याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष होत्या. या दोघांसोबतच सांगलीतील शेखर इनामदार यांचीही राज्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० रद्द करण्यामागची पक्षाची भूमिका काय? यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी क्षेत्रनिहाय समितीच्या नियुक्त्याही पाटील यांनी केल्या आहेत. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ‘सेवा सप्ताह’चं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठीही समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.   हेही वाचा-

जागावाटपात भाजपा वरचढ, शिवसेनेला ११० जागांची आॅफर?

७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मुंबई दौरासंबंधित विषय
ताज्या बातम्या