मतदार राजा जाग रे !

    मुंबई  -  

    मुंबई - 25 जानेवारी.. हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधत राज्य निवडणूक आयोग, मुंबई महानगरपालिका आणि सीआयआयच्या संयुक्त विद्यमानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील दीक्षांत सभागृहात आयोजित मतदार जनजागृती अभियानाला राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांच्यासह पालिकेचे अतिरक्त आयुक्त संजय देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. राज्य निवडणूक आयोगाचे अधिकृत माध्यम सहयोगी 'मुंबई लाइव्ह'नेही या अभियानात आपला खारीचा वाटा उचलला.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.