Advertisement

जेएनयूतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा वांद्रेमध्ये निषेध

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया इथं आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता वांद्रे इथं शांततेत हे आंदोलन पार पडलं.

जेएनयूतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा वांद्रेमध्ये निषेध
SHARES

जेएनयूत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा देशभरातून निषेध केला जात आहे. मुंबईतली वांद्रे इथंही बुधवारी रात्री आंदोलन करून निषेध करण्यात आला. जेएनयूमध्ये हल्ला करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया इथं आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता वांद्रे इथं शांततेत हे आंदोलन पार पडलं

विद्यार्थ्यांनी हातात पोस्टर आणि तोंड रूमालानं बांधून या आंदोलनात हल्ल्याचा निषेध नोंदवला. विद्यार्थ्यांसोबतच आंदोलनात लहान मुलांचाही सहभाग होता


विशेष म्हणजे फैज अहमद फैज यांच्या हम देखेंगे, लाजिम है की हम देखेंगे या कवितेतील ओळीचे पोस्टर, आझादी, हम एक है असे पोस्टर देखील झळकलेले दिसले. मोबाईलचे टॉर्च लावून आंदोलकांनी शांततेच्या मार्गानं निषेध नोंदवत सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.


रविवारी सायंकाळी दिल्लीतील जेएनयू म्हणजेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी-शिक्षकांवर काही अज्ञात गुंडांनी हल्ला केला. संकुलातील मालमत्तेचंही नुकसान केलं. यानंतर देशभर या घटनेचे पडसाद उमटले. मुंबईत बॉलिवूड सेलिब्रिटींनी रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध केला होता.



हेही वाचा

JNU विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर मुंबईत गुन्हे दाखल

JNU च्या निषेधार्थ मुंबईतील आंदोलन मागे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा