Advertisement

सिटी सेंटर मॉलच्या वरच्या भागाचं अधिक नुकसान : पालिका

सिटी सेंटर मॉलचा वरचा भाग आठवडाभरापूर्वी लागलेल्या भीषण आगीत जळून खाक झाला आहे. त्यामुळे या पूर्ण भागाची त्वरीत दुरुस्ती होणं आवश्यक आहे.

सिटी सेंटर मॉलच्या वरच्या भागाचं अधिक नुकसान : पालिका
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)नं म्हटलं आहे की, सिटी सेंटर मॉलचा वरचा भाग आठवडाभरापूर्वी लागलेल्या भीषण आगीत जळून खाक झाला आहे. त्यामुळे या पूर्ण भागाची त्वरीत दुरुस्ती होणं आवश्यक आहे.

मुंबईच्या मध्यवर्ती शहरातील सिटी सेंटर मॉलला लागलेली आग जवळपास ५६ तासाच्या प्रयत्नानंतर बुजवण्यात आली. मुंबईत अग्निशमन दलाच्या या सर्वात प्रदीर्घ कार्यापैकी एक म्हणून म्हटलं जाऊ शकतं. प्राथमिक माहितीनुसार, मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरील दुकानात असलेल्या मोबाईल बॅटरीला आग लागली होती आणि अखेर संपूर्ण मजला आगीनं भस्मसात झाला.

टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, प्रशासकिय अधिकाऱ्यासह स्ट्रक्चरल ऑडिटरनं मॉलच्या परिसराची तपासणी केली. यात त्यांना तातडीनं डागडुजी करण्याची आवश्यक्ता असल्याचं जाणवलं.

वरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आर्किड टॉवरचा टेरेस भाग न वापरण्याची सूचना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. मॉलमधील दुरुस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत अधिकाऱ्यांनी टॉवरमधील हाऊसिंग सोसायटीला त्यांच्या व्यासपीठाचा निम्मा भाग वापरण्यास सांगितलं आहे.

सिटी सेंटर मॉलमध्ये अनधिकृत बांधकाम होते हे न्यायालयात सिद्ध करण्याचा पालिका प्रयत्न करेल. २०१९ मध्ये त्यांनी मालकास स्टॉप-वर्क नोटीस दिली असल्याची माहिती प्रशीसकिय अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, गुरुवारी मुंबईत आगीच्या दोन घटना घडल्या एक पवई आणि दुसरी अंधेरी पूर्व इथं. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलानं (BMC) सकाळी ११: १९ वाजता सनसिटी कॉम्प्लेक्सजवळील त्रिकुट टॉवर्सच्या दुसऱ्या मजल्यावरील आग विझविली.

गुरुवारी रात्री १२.१९ वाजता आग लागण्याची आणखी एक घटना घडली. महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाच्या विभागानं रात्री १२.३१ वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली.हेही वाचा

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं कंत्राट एल अॅण्ड टी ला

सांडपाण्यावर प्रक्रिया न करता समुद्रात सोडल्यानं पालिकेला दंड

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement