Advertisement

बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या कामाला तातडीने सुरूवात: मुख्यमंत्री


बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या कामाला तातडीने सुरूवात: मुख्यमंत्री
SHARES

शिवसेनाप्रमुख दि. बाळासाहेब ठाकरे यांचं शिवाजीपार्क येथील महापौर निवासस्थानाच्या जागेवर राष्ट्रीय स्मारक बनवण्यात येणार आहे. या स्मारकाचा आढावा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुयायांची संख्या, वाहनतळ, सोयीसुविधायुक्त असा सविस्तर आराखडात तयार करण्याचे निर्देश नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. हा आराखडा बनल्यानंतर तातडीने स्मारकाच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.


स्मारकाचं सादरीकरण

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात यासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सुमित मल्लिक, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, प्रधान सचिव मनिषा म्हैसकर आदी उपस्थित होते. यावेळी महापौर निवासस्थानाच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या शिवसेना प्रमुखांच्या राष्ट्रीय स्मारकासंदर्भात सादरीकरण करण्यात आलं.


प्रेरणा देणारं राष्ट्रीय स्मारक

यावेळी मुख्यमंत्र्यांनी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा आराखडा तयार करताना तिथं येणाऱ्या अनुयायांची संख्या, त्यांना पुरवायच्या सोयी-सुविधा, , वाहनतळ आदींचा अंतर्भाव करून सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. सर्वांना प्रेरणा मिळेल, असं राष्ट्रीय स्थानक उभारण्यासाठी नगरविकास खात्याने कृती आराखडा तयार करावा. याबाबतचा सविस्तर आराखडा प्राप्त झाल्यानंतर तातडीने पुढील कार्यवाही करावी, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.



हेही वाचा-

बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाविरोधातील याचिका फेटाळा: राज्य सरकार


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा