हात माझा होता की दुसऱ्याचा कळेचना - मुख्यमंत्री

 Vidhan Bhavan
हात माझा होता की दुसऱ्याचा कळेचना - मुख्यमंत्री

नरिमन पॉईंट - रेल्वेतील प्रचंड गर्दी, घामाजलेला चेहरा, वरची कडी पकडण्याची धडपड, पण हात हलवायलाही जागा नाही...ही परिस्थिती कुणा सामान्य मुंबईकराची नसून ती आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच हा अनुभव विधानसभेत सांगितला. 

विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोच्या कामाविषयी माहिती देताना एक किस्सा सांगितला. "एकदा मी मीरा रोडवरून सीएसटीला येत होतो. प्लॅटफॉर्मवर उभा होतो. आलेली ट्रेन थांबायच्या आतच भरली. खूप लढाई करून ट्रेनमध्ये चढलो. ट्रेनमध्ये दादरपर्यंत खूप गर्दी होती. त्या गर्दीत खाजवताना आपला हात आहे की, दूसऱ्याचा हात आहे हेच कळत नव्हते," असा मजेशीर किस्सा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितला. या वेळी सभागृहात एकच हशा पिकला.

या वेळी अर्थसंकल्पावरील विभागवार चर्चेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिले. मुंबईमधील मेट्रोचे काम कुठपर्यंत सुरू आहे? मुंबईमध्ये मेट्रोची किती गरज आहे? याची माहिती विधान सभेत दिली. त्यावेळी रेल्वेने प्रवास केलेला अनुभव सांगत अशा परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मेट्रोचे जाळे मुंबईत पसरवले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवदेनात म्हटले.

Loading Comments