Advertisement

मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडण्याचा प्रयत्न - अशोक चव्हाण


मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडण्याचा प्रयत्न - अशोक चव्हाण
SHARES

राज्यात शेतकरी संपाला मिळणारा प्रतिसाद पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांना न्याय दिला पाहिजे, तसेच शेतकरी संपाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचेही अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले. मुंबई काँग्रेस प्रदेश कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत आपली भूमिका स्पष्ट करून विशेष अधिवेशन बोलावून शेतकरी कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

यावर अभ्यास करण्यासाठी किती वेळ लागणार? तसेच समृद्धी मार्गावर पैसे खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, असे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. त्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीका केली.


हेही वाचा -

शेतकऱ्यांच्या संपात फूट

शेतकरी संपावर बोलायचं नाय !

मुंबईकरांनो, आठवडा बाजार सुरूच राहणार - सदाभाऊ खोत


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा