Advertisement

सचिन वाझे पुन्हा सेवेत कसे?, गृहमंत्र्यांनी केला खुलासा

वाझे सेवेत पुन्हा परतले. त्याचा गृहमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांशी थेट कुठलाही संबंध नाही, असं अनिल देशमुख म्हणाले.

सचिन वाझे पुन्हा सेवेत कसे?, गृहमंत्र्यांनी केला खुलासा
SHARES

सचिन वाझे यांच्यासारख्या एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याला सेवेत परत घेण्याचा अधिकार हा गृहमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांचा नसतो, असं म्हणत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यावरून करण्यात येत असलेले सर्व आरोप फेटाळून लावले. एवढंच नाही तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आरोप केवळ राजकीय असल्याचंही सांगितलं.

आपण मुख्यमंत्री असताना २०१८ मध्ये सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस दलात परत घेण्यासाठी शिवसेनेने दबाव आणल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल देशमुख (anil deshmukh) म्हणाले की, एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत सामावून घ्यायचं की नाही हे ठरवण्यासाठी आयुक्तांच्या स्तरावर समिती असते. ही समितीच संबंधित अधिकाऱ्याच्या कामगिरीचा आढावा घेऊन निर्णय घेते. त्यानुसारच वाझे सेवेत पुन्हा परतले. त्याचा गृहमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांशी थेट कुठलाही संबंध नाही. 

हेही वाचा- राज्यात १२,५०० पोलिसांची भरती करणार, गृहमंत्र्यांची घोषणा

उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर आढळलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात तपास करताना पोलीस दलातील अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका झाल्या. या चुका अक्षम्य स्वरूपाच्या आहेत. त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष व्हावी, यासाठी आम्ही आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिळून परमबीर सिंह यांची बदली केली. पोलीस आयुक्तांची बदली ही रूटीन बदली नसल्याची कबुली देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

अँटिलिया स्फोटक प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून केला जात आहे. या चौकशीत जे समोर येईल, त्यानुसार राज्य सरकार कारवाई करेल. कुठलाही अधिकारी, कर्मचारी या चौकशीत दोषी आढळून आल्यास त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल, असंही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. 

सचिन वाझे यांच्या अटकेनंतर परमबीर सिंग यांची बदली करून राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस (mumbai police) आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर परमबीर सिंग यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. सोबतच रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे आणि संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी देण्यात आली आहे.

(cm or home minister not responsible for bring back sachin vaze in mumbai police department says anil deshmukh)

हेही वाचा- सचिन वाझेंच्या प्रॅडोसहीत २ मर्सिडिज जप्त


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा