डोंगरीतील इफ्तार पार्टीत मुख्यमंत्री सहभागी

 Dongri
डोंगरीतील इफ्तार पार्टीत मुख्यमंत्री सहभागी
Dongri, Mumbai  -  

दाऊदी बोहरा समाजातर्फे सोमवारी संध्याकाळी डोंगरी येथील नजम बाग येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार पार्टीला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि भाजपा प्रवक्त्या शायना एनसी देखील उपस्थित होत्या.

यावेळी मेजवानीला जमलेल्या लोकांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, "रमझान महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे. या महिन्यात देवाकडे जे काही काही मागितले जाते, त्या सर्व इच्छा पूर्ण होतात. महाराष्ट्रात चांगले पीक येवो, कुणीही बेरोजगार राहू नये, प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन येवो अशी प्रार्थना माझ्यासोबत आपणही देवाकडे मागावी. दाऊदी बोहरा समाजाने राज्याच्या आणि देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. भेंडीबाजार क्लस्टर डेव्हलपमेन्ट प्रकल्प पूर्णत्वास नेऊ आणि परिवर्तन करत राहू."

Loading Comments