मंत्रीमंडळ विस्ताराचं सस्पेन्स संपणार? उद्धव ठाकरे, शरद पवारांची भेट

शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री ​उद्धव ठाकरे​​​ आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यात वरळीतील नेहरू सेंटरमध्ये महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर राज्यातील मंत्रीमंडळ विस्ताराचं सस्पेन्स संपण्याची चिन्हे आहेत.

SHARE

महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येऊन आठवडा उलटून गेला तरी मंत्रीमंडळ विस्तार न झाल्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील नेतेमंडळी चिंतेत आहेत. त्यातच शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यात वरळीतील नेहरू सेंटरमध्ये महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर राज्यातील मंत्रीमंडळ विस्ताराचं सस्पेन्स संपण्याची चिन्हे आहेत. 

हेही वाचा- ‘या’ दोघांमुळे ठाकरे सरकारचे मंत्री बिनखात्याचे

नेहरू सेंटरमध्ये झालेल्या बैठकीत काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिवसेनेकडून सुभाष देसाई, एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे तसंच राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि अजित पवार उपस्थित होते.

या बैठकीत प्रामुख्याने मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. शरद पवार संसदेच्या हिवाळी अधिवेशात दिल्लीत बिझी असल्याने खातेवाटपावरील चर्चा रखडल्याचं सांगितलं जात होतं. मात्र पवार यांनी मुंबईत येऊन खातेवाटपावर प्राधान्याने बोलणी केल्याची शक्यता आहे.  

संबंधित विषय
ताज्या बातम्या