Advertisement

सीमा लढा माझ्या अंतरकरणाच्या जवळचा विषय- उद्धव ठाकरे

आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून सीमा लढ्याचा वसा आणि वारसा मला मिळाला आहे. या लढ्याशी आपले नाते आणि ऋणानुबंध दोन पिढ्याचे आहे,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

सीमा लढा माझ्या अंतरकरणाच्या जवळचा विषय- उद्धव ठाकरे
SHARES

‘सीमा लढा माझ्या अंतरकरणाच्या जवळचा विषय आहे. आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून सीमा लढ्याचा वसा आणि वारसा मला मिळाला आहे. या लढ्याशी आपले नाते आणि ऋणानुबंध दोन पिढ्याचे आहे,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत देण्यात येणारी अधिस्वीकृती पत्रिका पहिल्यांदाच सीमा भागातील मराठी वृत्तपत्रांच्या दोन महिला संपादकाना मंजूर करण्यात आली आहे. वर्षा निवासस्थानी झालेल्या समारंभात या पत्रिकांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बेळगाव जिल्ह्यातील दैनिक वार्ताच्या संपादक क्रांती सुहास हुद्दार व दैनिक स्वतंत्र प्रगतीच्या संपादक बबिता राजेंद्र पोवार यांना वितरण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यात मराठी माणसांची एकजूट काय आहे, हे दाखवूया. कर्नाटक सरकार ज्या पद्धतीने न्यायालयाचा अवमान करून सीमाभागात एक-एक पाऊल टाकत आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासन यापुढं पावलं टाकेल. त्यासाठी सर्वपक्षीयांची, सर्व नेत्यांची एकजूट करू या. सीमावासियांचा आक्रोश राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोहचविण्यासाठी प्रयत्न करू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

हेही वाचा- औरंगाबाद विमानतळाचं नामकरण छ.संभाजी महाराज करा- उद्धव ठाकरे

सीमाभागातील माता भगिनींना न्याय मिळवून देण्याची आमची जिद्द आहे. या भागातील अन्यायाचा टाहो राज्यातील अन्य भागात पोहचविण्याची गरज आहे. गेली चौसष्ठ वर्षे हा लढा सुरु आहे. पण आता पिढ्या बदलल्या आहेत. त्यमुळे या प्रश्नाची दाहकता, या भागातील मराठी भाषिकांचा लोकांचा टाहो राज्याच्या अन्य जिल्ह्यात पोहचविण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. त्यामुळे सीमावासीय अन्यायाच्या विरोधात जे-जे पाऊल टाकतील, त्यासाठी सर्व ते सहकार्य केले जाईल, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं.

कर्नाटक सरकार सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असतानाही एक-एक पाऊल टाकून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करत असल्याचं नमूद करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, या प्रश्नात एकजूट करण्यासाठी सर्वपक्षीय, सर्व नेत्यांनी आप-आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीतही आता एकी दिसत नाही. या सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाईल. ज्या पद्धतीने कर्नाटक सरकार पावले टाकत आहे. त्याचपद्धतीने महाराष्ट्र सरकारही पावले टाकेल. यातून महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची एकजूट काय आहे, हे दाखवू या, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

(cm uddhav thackeray reacts on maharashtra and karnataka border issue)


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा