Advertisement

भास्कर जाधव का आहेत नाराज? मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

रत्नागिरीतील (ratnagiri) प्रत्येक कार्यक्रमात भास्कर जाधव मुख्यमंत्र्यांपासून अंतर राखून होते. तीन जिल्ह्यांच्या विकास आढावा बैठकीलाही ते अनुपस्थित राहिले.

भास्कर जाधव का आहेत नाराज? मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
SHARES

गुहागरचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (Shiv sena mla bhaskar jadhav) यांच्या नाराजीची दखल घेत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (cm uddhav thackearay) यांनी स्वत: त्यांच्याशी फोनवर संवाद साधल्याचं समजत आहे. मात्र जाधव नेमके कुठल्या कारणामुळे नाराज होते, हे अजूनही कळू शकलेलं नाही.

कोकणातील (kokan visit) विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackearay) यांनी नुकताच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा दौरा केला. या दौऱ्यात कोकणातील शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यात भास्कर जाधव (Shiv sena mla bhaskar jadhav) यांचा देखील समावेश होता. 

हेही वाचा- योगी आदित्यनाथ म्हणजे जनरल डायर- नवाब मलिक

मात्र रत्नागिरीतील (ratnagiri) प्रत्येक कार्यक्रमात भास्कर जाधव मुख्यमंत्र्यांपासून अंतर राखून होते. तीन जिल्ह्यांच्या विकास आढावा बैठकीलाही ते अनुपस्थित राहिले. इतकंच नाही, तर एका कार्यक्रमात स्टेजवर त्यांनी खासदार राऊत (vinayak raut) यांचा हात झटकल्याचा व्हि़डिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांचं नाराजीनाट्य समोर आलं.  

मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यात राजशिष्टाचारानुसार त्यांना सन्मान मिळाला नाही, अशी त्यांची तक्रार असल्याचं म्हटलं जात असलं, तरी त्यामागचं कारण वेगळं असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. तसं बघायला गेलं तर भास्कर जाधव (Shiv sena mla bhaskar jadhav) हे मूळचे शिवसेनेचेच, पण मधल्या काळात ते राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले होते. आघाडी सरकारच्या काळात ते नगरविकास राज्यमंत्रीही हाेते. 

पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत (vidhan sabha) त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. त्याआधी त्यांना शिवसेनेकडून मंत्रीपदाचं आश्वासन देण्यात आलं होतं. परंतु महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्रीपदाची संधी न मिळाल्याने ते नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. ही नाराजी त्यांनी कोकण दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या समोर उघड केली.  

हेही वाचा- उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भास्कर जाधवांनी विनायक राऊतांना दिला धक्का

जाधव यांच्या नाराजीची दखल घेतल्यानंतर ते नेमके का नाराज आहेत, याची माहिती घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी विनायक राऊत यांना दिल्या आहेत. राऊत लवकरच जाधव यांची भेट घेणार आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा