आणखी एका फोटोमुळे मुख्यमंत्री अडचणीत

 Mumbai
आणखी एका फोटोमुळे मुख्यमंत्री अडचणीत

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या आणखी एका फोटोमुळे चांगलेच चर्चेत आलेत. मुख्यमंत्र्यांसोबत अकबर हुसैन उर्फ राजू बाटला याचा फोटो सध्या व्हायरल होतोय. सूत्रांच्या माहितूनुसार अकबर हुसैन उर्फ राजू बाटलाच्या विरोधात २३ खटले दाखल आहेत. स्मगलिंग, खून, खूनाचा प्रयत्न यासारखे गुन्हे त्याच्यावर आहेत. त्याला माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या हत्येच्या कटामध्ये अटक झाली होती. दरम्यान 2015 मधील एका कार्यक्रमात नगरसेविका खैरून्निसा हुसेन आल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा पती अकबर हुसेन उर्फ राजू बाटला आला होता. त्यावेळी इतर मान्यवरांसोबत हा फोटो काढल्याची सारवासारव मुख्यमंत्री कार्यालयातून करण्यात आलीय.

Loading Comments