रिझर्व्ह बँकेविरोधात 'सहकार बचाव' महामोर्चा

सीएसटी - महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्यावतीनं मुंबईच्या आझादनगर मैदानात सहकार बचाव महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महामोर्चात सत्ताधारी आणि विरोधक एकाच मंचावर दिसलेत. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर रिझर्व्ह बँकेनं जिल्हा बँका आणि पतसंस्थांवर या नोटा स्वीकारण्याबाबत निर्बंध घातले. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या विरोधात हा महामोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे एकमेकांवर विरोध करणारे विरोधक सत्ताधारी एकाच मंचावर पाहायला मिळालेत.

Loading Comments