Advertisement

भाजपाच्या खेळीत काँग्रेस गारद


भाजपाच्या खेळीत काँग्रेस गारद
SHARES

मुंबई - मुंबई महापालिकेच्या सत्ता स्थापनेच्या खेळीत शिवसेना पक्ष आघाडीवर असून त्यांना काँग्रेसकडूनही साथ मिळेल या भीतीने भाजपावाले धास्तावले आहेत. त्यामुळेच आयुक्तांना हाताशी धरून भाजपाने उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीच्या तारखेचा मुहूर्त साधत 8 मार्चला महापौरपदाची निवडणूक घेण्याचा घाट घातला आहे. उत्तरप्रदेशची निवडणूक 8 मार्चला असून जर काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिल्यास त्याचे भांडवल करून उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत फायदा उठवता येईल, हा भाजपाचा व्होरा होता. परंतु आता काँग्रेसनेच आपला महापौरपदाचा उमेदवार देण्याचे जाहीर केले असून शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे भाजपाच्या या खेळीत काँग्रेस गारद झाल्याचे दिसून येत आहे.

मुंबई महापालिकेच्या राजकारणात भाजपा अग्रेसर ठरताना दिसत आहे. निवडणूक निकालानंतरच त्वरीतच भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी पट्टी आणि फूटपट्टीची उदाहरणे देत पाच अपक्ष नगरसेवकांचा भाजपाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. मुळात पाचपैकी चार अपक्ष नगरसेवक हे शिवसेनेचे बंडखोर होते. परंतु भाजपाने अशाप्रकारे घोषणा केल्यामुळे शिवसेनेला या पाचही अपक्ष नगरसेवकांच्या मागे धावावे लागले. त्यामुळे या खेळीतच भाजपा जिंकली होती. मात्र, त्यानंतर 9 मार्च ऐवजी 8 मार्चला महापौरपदाची निवडणूक घेण्याचा खेळ करत आपला डाव साध्य करून घेतला आहे. काँग्रेस पक्ष हा शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देईल आणि त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला तर याचा फायदा 8 मार्चला होत असलेल्या उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत घेता येईल, असा अंदाज भाजपाचा होता. त्यामुळेच आयुक्तांची मदत घेऊन त्यांनी 8 मार्चला महापौरपदाची निवडणूक घेण्याचा कार्यक्रम आखण्याचे ठरवले. परंतु भाजपाच्या या खेळीमुळे काँग्रेसने पाठिंबा देण्याचा विचारच काढून टाकत विरोधात उमेदवार देण्याचे जाहीर केले. त्यामुळे काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा न देण्याचा मार्गच सुकर झाला. त्यामुळे भाजपासमोरील डोकेदुखी कमी झाली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा