Advertisement

उर्मिला मातोंडकरला हवंय पोलिस संरक्षण

प्रचारादरम्यान उर्मिला मातोंडकर यांची रॅली बोरीवली स्थानकाजवळ आली असता काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजपाच्या काही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपाविरोधात घोषणाबाजीही केली.

उर्मिला मातोंडकरला हवंय पोलिस संरक्षण
SHARES

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आता उमेदवारांचा प्रचारही शिगेला पोहोचला आहे. यातच सोमवारी उत्तर मुंबईच्या काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रचारादरम्यान उर्मिला मातोंडकर यांची रॅली बोरीवली स्थानकाजवळ आली असता काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजपाच्या काही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं पहायला मिळालं. तसंच यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपाविरोधात घोषणाबाजीही केली. या प्रकरणानंतर उर्मिला मातोंडकरनं पोलिस संरक्षणाची मागणी केली.


परिस्थिती नियंत्रणात

बोरीवली परिसरात समोरासमोर आल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी मोदींच्या नावानं घोषणा देण्यास सुरूवात केली. तर दुसरीकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी सुरू केली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना हटवलं.


उर्मिला, शेट्टीमध्ये सामना

मुंबई उत्तर मतदारसंघात उर्मिला मातोंडकर आणि भाजपाच्या गोपाळ शेट्टींमध्ये थेट सामना रंगणार आहे. उर्मिला मातोंडकर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून गोपाळ शेट्टी या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत.  २०१४ मध्ये गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसच्या संजय निरूपम यांचा जवळपास ४ लाख मतांनी पराभव केला होता.
हेही वाचा -

लोकसभा निवडणूक: मुंबई, ठाणे, पालघरमधून १९४ उमेदवार रिंगणात

भाजपा आमदार मंदा म्हात्रेंविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रारRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा