Advertisement

महाआघाडीचा २४-२० चा फॉर्म्युला; मित्रपक्षांना ४ जागा

महाआघाडीच्या शनिवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत अखेर लोकसभेच्या जागांचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. राज्यात काँग्रेस २४, तर राष्ट्रवादी काँग्रेस २० जागांवर निवडणूक लढवणार आहे.

महाआघाडीचा २४-२० चा फॉर्म्युला; मित्रपक्षांना ४ जागा
SHARES

महाआघाडीच्या शनिवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत अखेर लोकसभेच्या जागांचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. राज्यात काँग्रेस २४, तर राष्ट्रवादी काँग्रेस २० जागांवर निवडणूक लढवणार आहे. सोबतच महाआघाडीतील मित्रपक्षांना ४ जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. राजू शेट्टी आदी उपस्थित होते. मात्र काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील या परिषदेला गैरहजर होते.


मित्रपक्षांना ४ जागा

महाआघाडीनं मित्रपक्षांना ४ जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. बहुजन विकास आघाडीला १ जागा, स्वाभिमानीला २ जागा तर युवा स्वाभिमानी पक्षाला १ जागा देण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, पिपल्स रिपब्लिक पार्टी कवाडे गट, बहुजन विकास आघाडी, युवा स्वाभिमान पार्टी, ऑल इंडिया विमुक्त भटक्या जाती जमाती, आरपीआय डेमोक्रॅटीक, स्वाभिमानी रिपब्लिक पक्ष, भीमसेना, युनायटेड रिपब्लिक पक्षा, गणराज्य संघ, इंडियन डेमोक्रॅटिक अलायन्स, महाराष्ट्र मुस्लिम संघ, आंबेडकर विचार मंच, महाराष्ट्र परिवर्तन सेना, स्वाभिमान रिपाईं, आरपीआय खरात गट या पक्षांना महाआघाडीत सामील करण्यात आलं आहे.


भाजपाला धडा शिकवणार

यावेळी चव्हाण यांनी भाजपावर निशाणा साधला. तसंच राज्य सरकारच्या कारभारावरही टीका केली. भाजपा, शिवसेनेसारख्या धर्मांध पक्षांना जनता नक्कीच धडा शिकवेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच भाजपा आणि इतर पक्षांकडून फोडाफोडीचं राजकारण केलं जातं असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा -

काँग्रेसच्या सातव्या यादीत महाराष्ट्रातील ५ उमेदवार; निरूपम मात्र प्रतिक्षेतच

'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमा रिलिज होऊ देणार नाही, मनसेचा इशारा
संबंधित विषय
Advertisement