Advertisement

कंगना पुन्हा हिमाचल प्रदेशला गेली, आरोपांचं काय?

बाॅलिवूड अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा आपल्या मूळ गावी म्हणजेच हिमाचल प्रदेशला परतली आहे. यामुळे कंगना करत असलेल्या आरोपांचं काय झालं? असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे.

कंगना पुन्हा हिमाचल प्रदेशला गेली, आरोपांचं काय?
SHARES

मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणारी, बाॅलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनचा भांडाफोड करण्याचा दावा करणारी आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई करणाऱ्या मुंबई महापालिकेशी पंगा घेणारी बाॅलिवूड अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा आपल्या मूळ गावी म्हणजेच हिमाचल प्रदेशला परतली आहे. यामुळे कंगना करत असलेल्या आरोपांचं काय झालं? असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे. (congress ask questions on bollywood connection with drug mafia after actress kangana ranaut returns himachal pradesh)

मुंबईत जर असुरक्षित वाटत असेल, तर हिमाचल प्रदेशमध्येच रहा, असा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सल्ला दिल्यानंतर मला मुंबईत येताना कुणीही अडवू शकत नाही, कुणात हिंमत असेल, त्याने मला रोखून दाखवावं, असं आव्हान देणारी कंगना वाय प्लस सुरक्षेत मुंबईत दाखल झाली खरी. परंतु अवघे ४ ते ५ दिवस राहून ती पुन्हा एकदा हिमाचल प्रदेशला परतली आहे. 

हेही वाचा- कंगनाच्या 'त्या' वादग्रस्त व्हिडिओची होणार चौकशी

यासंदर्भात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, कंगना रणौत पुन्हा हिमाचल प्रदेशला परतली. आश्चर्यच आहे! बाॅलिवूड आणि ड्रग माफियाचं कनेक्शन असल्याचा दावा करणाऱ्या तिच्याकडील माहितीचं काय झालं? अंमलीपदार्थ विरोधी पथका ( NCB) ला माहिती देणं हे तिचं कर्तव्य नव्हतं काय?  भादंसं कलम २०२ आणि १७६ एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत अशा प्रकारच्या गुन्ह्याची माहिती लपवणं हा देखील एक गुन्हा ठरत नाही का? की ही फक्त एक लबाडी होती? 

सुशांत सिंग राजपूत मृत्यूच्या प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर ‘एनसीबी’ने धरपकड सुरू केली आहे. शनिवारी पोलिसांनी या प्रकरणात ६ जणांना अटक केली. करमजीत सिंह, ड्वेन फर्नांडिस, संकेत पटेल, अंकुश अनरेजा, संदीप गुप्ता, आफताब फतेह अन्सरी अशी या आरोपींची नावे आहेत. या आरोपींच्या चौकशीतून मुंबईच्या रस्त्यांवर ड्रग्जची तस्करी करण्यासाठी त्यांनी आलिशान कारचा वापर केल्याची माहिती दिली आहे.  

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांत सिंग राजपूतला कुठे आणि कुणी मादक पदार्थांच्या व्यसनाची सवय लागली याचा खुलासा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यात २५ सेलिब्रिटींचीही नावे पुढे आली आहेत. बॉलिवूडच्या  एका दिग्दर्शकामुळे सुशांतला नशेची सवय लागल्याची माहिती रियाने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. ती व्यक्ती वेळोवेळी सुशांतला अशा पार्ट्यांमध्ये घेऊन जायची. ज्या ठिकाणी अंमली पदार्थांचं सेवन मोठ्या प्रमाणात केलं जायचं, त्या पार्टीत सुशांत कोकेन, गांजा, एलएसजी या पदार्थाचं सेवन करायचा. सुशांतने रियाला याबाबत सांगितलं होतं, बाॅलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी या ड्रग्जच्या व्यसनात अडकलेले आहेत.

हेही वाचा- आलिशान गाड्यांमधून केली जायची ड्रग्ज तस्करी 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा