Advertisement

सत्तेत असूनही अनेक जण विरोधी पक्षात असल्यासारखे वागतात - गडकरी


सत्तेत असूनही अनेक जण विरोधी पक्षात असल्यासारखे वागतात - गडकरी
SHARES

अनेक वर्ष विरोधी पक्षात काढल्यानंतर सत्तेत आलेले काहीजण अजूनही विरोधी पक्षात असल्यासारखे वागतात, असा चिमटा काढत आपण हे शिवसेनेबद्दल बोलत नसल्याचे गडकरी यांनी स्पष्ट करताच सभागृहात एकच हशा पिकला. विरोधी पक्षात असताना केलेल्या आंदोलनाची आजही आठवण येत असल्याचे त्यांनी सांगितले. दिलीप वळसे पाटील यांच्या मुंबईमध्ये पार पडलेल्या एकसष्ठीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, रामदास आठवले यांच्यासह सर्व पक्षातील दिग्गज नेते उपस्थित होते.


सत्ता येणाऱ्या पक्षाकडे येणाऱ्यांचे प्रमाण जास्त!

विचारांशी कटिबद्धता ठेवण्यापेक्षा सत्ता येणाऱ्या पक्षामध्ये जाण्याचे प्रमाण वाढत आहे. विचारांशी प्रामाणिक न राहता सत्ता असलेल्या पक्षामध्ये जाणे लोकशाहीसाठी योग्य नाही, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. आयुष्यभर एका विचारासाठी काम करत राहणे कठीण गोष्ट आहे. दिलीप वळसे पाटील मात्र प्रवाह कुठलाही असो, एकाच प्रवाहात राहिल्याचे गडकरी यांनी सांगितले. दिलीप वळसे पाटील यांनी सत्तेत आणि विरोधी पक्षात असताना नेहमीच संतुलन साधले. संयम कधीही सोडला नाही. त्यांच्याकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, असेही गडकरी म्हणाले. उत्तर प्रदेश-बिहारमध्ये फक्त राजकारण केले जाते, पण महाराष्ट्रात समाजकारण, राष्ट्रकारण, अर्थकारण आणि विकासकारण चालते, असे गडकरी म्हणाले.


...आणि संबंध भंगले!

नेहमीप्रमाणे आपल्या कवितेतून भाषणाची सुरुवात करणाऱ्या रामदास आठवले यांनी दिलीप वळसे पाटलांना चारोळ्यांच्या माघ्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. 'इथे पक्ष आले आहेत सहा, दिलीप रावांकडे उघड्या डोळ्याने पाहा, शरद पवार दिलीप रावांशी माझे संबंध होते चांगले, पण काही वर्षांपूर्वी हे संबंध भंगले', आठवलेंनी असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. दरम्यान या कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या इतर मान्यवरांनीदेखील दिलीप वळसे पाटील यांचे तोंडभरून कौतुक केले.



हेही वाचा - 

गडकरी म्हणाले, 'मुंबईतील रस्ते माझ्या अखत्यारीत नाही, हे दुर्दैव'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा