युती तुटूनही काँग्रेसला फायदा नाही?

  Mumbai
  युती तुटूनही काँग्रेसला फायदा नाही?
  मुंबई  -  

  मुंबई - महापालिका निवडणुकीत शिवसेना- भाजपाची युती तुटुनही काँग्रेसला त्याचा फायदा घेता आला नाही असे चित्र सध्या दिसत आहे. एक्झिट पोलमध्येही काँग्रेसच्या हातातील जागा जातील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 1992 साली युती तुटल्याचा फायदा घेऊन काँग्रेस सत्तेवर आली मात्र यावेळी युती नसल्याचा फायदा काँग्रेसला उचलता आला नाही असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
  मुंबईतील एकूण प्रचारामध्ये भाजपा आणि शिवसेनेने आघाडी घेतली होती. मात्र काँग्रेसचा अंतर्गत वाद, एकमेकांवर कुरघोडी यामुळे प्रचारातही काँग्रेस आघाडी घेऊ शकली नाही. इतकंच नव्हे तर काँग्रेसच्या जाहिरनाम्याच्यावेळी राज्यातील मोठे नेतेही गैरहजर होते. या सगळ्यांचा परिणाम की काय सद्य स्थितीत काँग्रेस 52 जागा टिकवणार का याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. दरम्यान प्रचाराच्या पहिल्या दिवसांपासूनच एकमेकांवर काँग्रेसचे नेते टीका करत सुटल्याने याचे नुकसान काँग्रेसला सहन करावे लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मतदानानंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी मला हरवण्यासाठी काँग्रेसचे नेते राबले असा आरोप केला होता. मात्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी निरुपम यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं टाळत आम्ही आशावादी आहोत निकाल लागल्यानंतर कळेल अशी प्रतिक्रिया दिली. 1992 मध्ये शिवसेना भाजापा युती तुटल्याचा फायदा काँग्रेसने घेत महापालिकेत सत्ता स्थापन केली होती मात्र सध्या काँग्रेसला फायदा घेण्यात अपयश आल्याचं सांगत काँग्रेसमधील अंतर्गत वाद याला कारणीभूत असल्याचे राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी सांगितलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.