मुंबईचा महापौर ठरवणार काँग्रेस?

  Mumbai
  मुंबईचा महापौर ठरवणार काँग्रेस?
  मुंबई  -  

  मुंबई - महापालिकेच्या निवडणुकीचा अपेक्षित असाच कौल अखेर बाहेर आला. या निवडणुकीने शिवसेना आणि भाजपाची एैशी की तैशी केली असून, या दोन्ही पक्षांचे अनु्क्रमे ८४ आणि ८2 नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, या दोन्ही पक्षांना सत्ता स्थापनेसाठी मॅजिक फिगर गाठणे अशक्य असून, सत्ता स्थापनेसाठी तसेच महापौर बसवण्यासाठी काँग्रेस पक्ष हा किंगमेकर ठरणार आहे.

  महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे ८४ नगरसेवक तर भाजपाचे ८२ नगरसेवक निवडून आले आहेत. तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. काँग्रेसचे ३१ नगरसेवक निवडून आले आहेत. परंतु ८२ नगरसेवक निवडून आलेल्या भाजपाने पाच अपक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपाच असल्याने महापौर आपलाच असल्याचा दावा भाजपाने केला आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस ०९, मनसे ०७, एआयएमआयएम ३ यासह इतर ११ याप्रमाणे नगरसेवक निवडून आले आहेत. पण काँग्रेस सोडून इतरांचा पाठिंबा घेतला तरीही ११४ची संख्या पार करता भाजपाला येणार नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष हा ज्यांच्यासोबत जाईल, त्यांचीच सत्ता आणि महापौर होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काँग्रेस भाजपाला साथ देतो की शिवसेनेला हेच आता पाहायचे आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.