Advertisement

इंधनाचे दर आणखी भडकणार- अमित देशमुख

इंधनाचे दर कमालीचे भडकले असताना डिझेल आणि पेट्रोलवर आणखी अधिभार लावण्यात आलेला आहे. यामुळे इंधनाचे दर आणखी भडकणार आहेत, असं अमित देशमुख म्हणाले.

इंधनाचे दर आणखी भडकणार- अमित देशमुख
SHARES

इंधनाचे दर कमालीचे भडकले असताना डिझेल आणि पेट्रोलवर आणखी अधिभार लावण्यात आलेला आहे. यामुळे इंधनाचे दर आणखी भडकणार आहेत. कोरोना संकटानंतर सादर करण्यात आलेल्या या पहिल्या अर्थसंकल्पामध्ये खूप काही करण्यासारखं होते. अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी कल्पकतेने निर्णय घेणं अपेक्षित होतं. हेच दुर्दैवाने राहून गेलं आहे, असं म्हणत वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख (amit deshmukh) यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

अमित देशमुख पुढं म्हणाले, खरं तर अर्थसंकल्पातून देशाच्या आगामी काळातील विकासाची दिशा निश्चित व्हावयास हवी. अर्थसंकल्पात देशातील शेतकऱ्यांना काय दिलं, गरीबांना काय दिलं, विविध घटकातील विकासाच्या बाबतीत नेमके कोणते निर्णय घेतले? गेल्या वर्षभरातील लॉकडाऊनमुळे देशातील अर्थव्यवस्था पार कोलमडली आहे. या अर्थव्यवस्थेला सावरुन घेण्यासाठी काय उपाय केलं? याबाबत या अर्थसंकल्पात काहीही दिसत नाही.

हेही वाचा- अर्थसंकल्प की निवडणूक जाहीरनामा?- बाळासाहेब थोरात

आजच्या अर्थसंकल्पात आयकर संरचनेत कोणताही बदल करण्यात आला नसल्याने पगारदार वर्गाची निराशा झालेली आहे. कामगार वर्गासाठी, रोजगाराला तसंच गुंतवणुकीला उत्तेजन देण्यासाठी कोणतेही ठोस निर्णय नाहीत. यामुळे हा अर्थसंकल्प अतिशय निराशाजनक आहे. 

अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काहीही ठोस नसल्याने राज्याच्या पदरी निराशा आली आहे. थोडक्यात अर्थसंकल्पात महाराष्ट्र (maharashtra) कोठेही दिसत नसून, महाराष्ट्राला सापत्न वागणूक मिळाली आहे. अर्थसंकल्प हा विकासाचे गतिचक्र राखणारा असावयास हवा मात्र, केवळ काही राज्यांसाठी तेथील निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन शासकीय स्तरावरुन खिरापत वाटणं कितपत योग्य आहे? असा सवाल अमित देशमुख यांनी केला आहे.

(congress leader amit deshmukh criticized union budget 2021)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा