Advertisement

‘अशी’ झाली काँग्रेस महाविकास आघाडीत सामील, अशोक चव्हाणांनी केला खुलासा

काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये कसा सामील झाला, याचा खुलासा काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला.

‘अशी’ झाली काँग्रेस महाविकास आघाडीत सामील, अशोक चव्हाणांनी केला खुलासा
SHARES

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (maha vikas aghadi government) सत्तेत येऊन लवकरच एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये कसा सामील झाला, याचा खुलासा काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला. राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत आघाडी करण्यास दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी होकार दिल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळूनही दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून फाटलं होतं. त्यातच भाजप-राष्ट्रवादीचं सरकार औटघटकेचं ठरल्याने राज्यात अभूतपूर्व राजकीय पेच निर्माण झाला होता. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये (shiv sena, ncp, congress) वाटाघाटी सुरूच होत्या. त्यानंतर वेगवेगळ्या विचाराधारेच्या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार राज्यात स्थापन केलं. (congress leader ashok chavan talks on maha vikas aghadi government formation in maharashtra)

हेही वाचा- काळ्या फिती लावून सीमावासीयांना पाठिंबा- एकनाथ शिंदे

हे सरकार सत्तेत येऊन २८ नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे, त्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी सांगितलं की, शिवसेना आणि काँग्रेसची परस्परविरोधी विचारसरणी असल्याने शिवसेनेसोबत आघाडी करण्यास दिल्लीतील पक्षश्रेष्ठी अनुकूल नव्हेत. शिवसेनेसोबत मिळून सरकार स्थापन करण्याबाबत त्यांच्या मनात संभ्रम होता. मात्र भाजपला रोखायचं असेल तर शिवसेनेसोबत जावंच लागेल, असं ठाम मत राज्यातील काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केलं. त्यानंतर दिल्लीतील नेते या आघाडीसाठी तयार झाले, असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं. 

कोरोना व्हायरस, लाॅकडाऊन, अडचणीत सापडलेली अर्थव्यवस्था, अवकाळी पाऊस, मराठा आरक्षणासारखे अनेक सामाजिक, राजकीय प्रश्न, विरोधकांकडून होणारे हल्ले अशा एक ना अनेक अडथळ्यांवर मात करत राज्यातील महाविकास आघाडी सरकार वाटचाल करत आहे.

हेही वाचा- शरद पवारांकडे 'हर मर्ज की दवा'! शिवसेना नेत्याचा राज ठाकरेंना टोला

संबंधित विषय
Advertisement