Advertisement

“ते म्हणाले होते, स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही..”

सत्तेसाठी काहीही बोलायचं, नंतर कृती करायची नाही, हा भाजपचा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे.

“ते म्हणाले होते, स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही..”
SHARES

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय संन्यास घेण्याच्या वक्तव्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून चांगलाच समाचार घेण्यात येतोय. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनीही यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर कोपरखळी मारली. ते म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं तुम्ही फार गांभीर्याने घेतलं आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा सोडवू, असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. पुढच्या ५ वर्षांत तो दिवस आला नाही. त्यानंतर आता ओबीसी आरक्षण मिळवून दिलं नाही, तर संन्यास घेईन ते म्हणत आहेत.

सत्तेसाठी काहीही बोलायचं, नंतर कृती करायची नाही, हा भाजपचा (bjp) पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे. जनमाणसाला फसवणं आणि सत्ता मिळवणं हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्य करतात. विदर्भ स्वतंत्र होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले होते. मात्र त्यानंतर काय झालं आपण सर्वांनी पाहिलं, अशा शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोलाा हाणला.

हेही वाचा- मी फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही- संजय राऊत

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजने २६ जून रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन केलं होतं. नागपूरमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनात बोलताना, राज्याची सूत्रे भाजपच्या हाती दिल्यास दोन ते तीन महिन्यांत ओबीसी आरक्षण परत मिळवून देतो आणि जर मी हे करू शकलो नाही तर राजकीय संन्यास घेईन, असं वक्तव्य केलं होतं.

त्यावर फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात काही जादूची कांडी असेल तर त्यांनी ती महाराष्ट्राच्या हितासाठी फिरवून समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. शेवटी समाजाचं हित हेच सत्ताधारी किंवा विरोधक अशा सगळ्याचं प्राधान्य असायला हवं. मग सत्ता असो किंवा नसो. मात्र ‘आधी सत्ता द्या, ओबीसींना ३ महिन्यांत आरक्षण देतो’ असं जर कोणी म्हणत असेल तर ही भावना खऱ्या लोकप्रतिनिधीची आहे का? त्यांना समाजाचं हित महत्त्वाचं आहे की सत्ता? असे प्रश्न उभे राहातात, असा प्रश्न शिवसेनेने (shiv sena) उपस्थित केला आहे.

(congress leader balasaheb thorat comment on devendra fadnavis statement on political retirement)

हेही वाचा- संजय राऊतांनी आम्हाला नैतिकतेचे धडे शिकवू नये, चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा