Advertisement

मानसिक छळ करण्यासाठी पाठवली प्राप्तिकर नोटीस- पृथ्वीराज चव्हाण

मला पाठवलेली नोटीस म्हणजे केंद्र सरकारचं षडयंत्र असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

मानसिक छळ करण्यासाठी पाठवली प्राप्तिकर नोटीस- पृथ्वीराज चव्हाण
SHARES

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना ऐन दिवाळीच्या दिवसांत प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) नोटीस पाठवली आहे. ही नोटीस म्हणजे केंद्र सरकारचं षडयंत्र असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

केंद्र सरकारवर टीका करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, हा नियमित कामकाजाचा भाग असं सांगण्यात येत असलं तरी, केवळ माझा मानसिक छळ करण्यासाठीच केंद्राच्या इशाऱ्यावरून मला ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांना मिळकत आणि मालमत्तेसंदर्भातील मागील 10 वर्षांची कागदपत्रे सादर करण्यास सांगितलं आहे. या नोटिशीला पुढील 21 दिवसांमध्ये उत्तर द्यायचं असून पृथ्वीराज चव्हाण यांना प्राप्तिकर कार्यालयात स्वतः हजर राहण्यास देखील सांगितलं आहे. या नोटिशीला योग्य त्या पद्धतीने सविस्तर उत्तर देण्यात येईल, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

केंद्रातील मोदी सरकारवर आरोप करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सत्तेचा कुणाविरोधात कसा वापर करून घ्यायच हे भाजपला खूप चांगल्या प्रकारे कळतं. त्यासाठी ते योजना आखतात. याच प्रकारे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील नोटीस पाठवण्यात आली होती. पण या नोटिशीला मी सविस्तर उत्तर पाठवणार आहे.

निवडणूक शपथपत्रात नमूद केलेल्या मालमत्तेच्या तपशीलाबाबात शरद पवार यांना ही नोटीस बजावण्यात आली होती.

पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था आणि कृषी कायद्याविरोधात देखील मोदी सरकारवर टीका केली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा