Advertisement

राजीनामा देणार नाही; राधाकृष्ण विखे-पाटील यांचं स्पष्टीकरण

विखे-पाटील आपल्या विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देतील अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. परंतु आपण राजीनामा देणार नसून पक्षाची भूमिका आपल्याला मान्य असेल असं स्पष्टीकरण देत विखे-पाटील यांनी राजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

राजीनामा देणार नाही; राधाकृष्ण विखे-पाटील यांचं स्पष्टीकरण
SHARES

मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पूत्र सुजय विखे-पाटील यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. त्यानंतर विखे-पाटील आपल्या विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देतील अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. परंतु आपण राजीनामा देणार नसून पक्षाची भूमिका आपल्याला मान्य असेल, असं स्पष्टीकरण देत विखे-पाटील यांनी राजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.


काय म्हणाले विखे?

मी आपल्या विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देणार नाही. परंतु पक्ष जी भूमिका घेईल ती मला मान्य असेल. तसंच जी जबाबदारी सोपवली जाईल, ती योग्यरित्या पार पाडेन, असं विखे-पाटील यांनी बोलताना स्पष्ट केलं. सुजय हे अहमदनगरच्या जागेवरून खासदारकीची निवडणुक लढवण्यास इच्छुक होते. परंतु ती जागा राष्ट्रवादीच्या पारड्यात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी सुजय यांच्यासाठी ती जागा सोडण्यास नकार दिला. त्यानंतर सुजय यांच्या भाजपात जाण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्याप्रमाणंच मंगळवारी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भाजपात प्रवेश केला.


नाईलाजास्तव निर्णय

सुजय यांना काँग्रेसकडून उमेदवारी हवी होती. तसंच राष्ट्रवादीकडून त्यांची निवडणूक लढवण्याची मानसिकता नव्हती. त्यामुळं नाईलाजास्तव त्यांनी हा निर्णय घेतला असून त्यांचा हा वैयक्तिक निर्णय असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं.



 हेही वाचा -

राज्यात काँग्रेसला मोठा धक्का; विरोधी पक्षनेत्याच्या मुलाच्या हाती ‘कमळ’

आता मुंबईहून थेट प्रयागराजपर्यंत विमानसेवा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा