Advertisement

सीबीआय कोणाच्या आदेशानुसार चौकशी करते हे भाजपने दाखवून दिलं- सचिन सावंत

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये याच कारणामुळे सीबीआय चौकशीवर बंदी घातली आहे.

सीबीआय कोणाच्या आदेशानुसार चौकशी करते हे भाजपने दाखवून दिलं- सचिन सावंत
SHARES

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी निशाणा साधला आहे.

राज्यांशी संबंधित विषयांवर CBI चौकशी राज्य सरकार किंवा उच्च न्यायालय निर्देशीत करते. पण वस्तूतः हल्ली सीबीआय कोणाच्या मार्गदर्शन व आदेशानुसार चौकशी करते हे भाजपने दर्शवून दिलं. त्याबद्दल भाजपचे (bjp) धन्यवाद! महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये याच कारणामुळे सीबीआय चौकशीवर बंदी घातली आहे, असं सचिन सावंत यांनी नमूद केलं आहे.

कार्यकारिणीत ठराव

निलंबित पोलीस सहायक निरिक्षक सचिन वाझे यांनी सीबीआयला लिहिलेल्या पत्रात परिवहनमंत्री अनिल परब (anil parab) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पैसे वसुलीसंदर्भातील आरोप केले आहेत. या आरोपांची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी भाजपची मागणी आहे. याबाबतचा ठराव नुकत्याच झालेल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला होता. त्याच अनुषंगाने चंद्रकांत पाटील यांनी हे पत्र लिहिलं आहे.

हेही वाचा- अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा, चंद्रकांत पाटलांचं गृहमंत्र्यांना पत्र

काय आहे पत्रात?

सचिन वाझे याला २००४ सालीच निलंबित करण्यात आलं होतं. मात्र, २०२० मध्ये सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने त्याला पुन्हा पोलीस दलात रुजू करुन घेतलं. परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांकडून २ कोटी रुपये वसूल करण्यास सांगितल्याचं वाझे याने चौकशीत उघड केलं आहे. 

तसंच अजित पवार यांनी दर्शन घोडावत यांच्या माध्यमातून बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांकडून तसंच उत्पादकांकडून १०० कोटी वसूल करण्यास सांगितल्याचंही सचिन वाझे याने कबुलीजबाबात सांगितलं आहे. त्यामुळे या दोघांचीही सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी (chandrakant patil) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा