Advertisement

संजय निरूपम यांचा काँग्रेस सोडण्याचा इशारा, तिकीट वाटपावर नाराज

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाही काँग्रेसमधील अंतर्गत वाद शमण्याची चिन्हे नाहीत. काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी तिकीट वाटपावर प्रचंड संताप व्यक्त करत पक्षाला रामराम ठोकण्याचा इशारा दिला आहे.

संजय निरूपम यांचा काँग्रेस सोडण्याचा इशारा, तिकीट वाटपावर नाराज
SHARES

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाही काँग्रेसमधील अंतर्गत वाद शमण्याची चिन्हे नाहीत. काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी तिकीट वाटपावर प्रचंड संताप व्यक्त करत पक्षाला रामराम ठोकण्याचा इशारा दिला आहे. निरुपम यांच्या इशाऱ्यामुळे काँग्रेसचा ताप वाढण्याची शक्यता आहे.

तर काँग्रेसला फटका

निरुपम हे उत्तर भारतीय मतदारांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यामुळे ते पक्षाबाहेर पडल्यास त्याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निरूपम यांचा राग कसा शांत करायचा याकडं काँग्रेसला लक्ष द्यावं लागणार आहे.

काय म्हणाले निरूपम

तिकीट वाटपात आपल्या समर्थकांना डावलल्याचं म्हणत निरुपम यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. निरुपम यांनी यासंदर्भात एक ट्विट करून तिकीट वाटपातील पक्षपातीपणावर बोट ठेवलं आहे. “पक्षाला माझ्या सेवेची गरज उरलेली दिसत नाही. मुंबईत विधानसभा निवडणुकीचं तिकीट वाटप सुरू असताना मी मुंबईतील केवळ एका उमेदवारासाठी शिफारस केली होती. त्या नावाला देखील बाजूला सारण्यात आलं. हे असंच होत राहणार असेल, तरी मी निवडणूक प्रचारात भाग घेणार नसल्याचं पक्ष नेतृत्वाला आधीच कळवलं आहे. हा माझा शेवटचा निर्णय आहे.” असं निरुपम यांनी म्हटलं आहे.

दिला इशारा

सोबतच आणखी एक ट्विट करत “पक्षाला अलविदा म्हणण्याची वेळ अजून तरी माझ्यावर आलेली नाही. परंतु नेतृत्वाच्या कार्यपद्धतीकडे पाहता हा दिवसही दूर नाही, असं वाटत आहे,” असं सांगत निरुपम यांनी काँग्रेस सोडण्याचा इशारा दिला आहे. 



हेही वाचा-

ईडीची शाखा भाजप कार्यालयात सुरू करा, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची भाजपवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेसची २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा