Advertisement

“कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नावाने सुरू असलेला तमाशा बंद करा!”

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नावाने सुरू असलेला तमाशा बंद करा!, अशा शब्दांत माजी खासदार आणि काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी आपला संताप व्यक्त केला.

“कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नावाने सुरू असलेला तमाशा बंद करा!”
SHARES

कोरोनाबाबतची सर्व सावधगिरी बाळगण्यासाठी हाॅटेल व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक तयार आहे. त्यासाठी नवी व्याख्या तयार करा. लाॅकडाऊनची काहीही गरज नाही. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नावाने सुरू असलेला तमाशा बंद करा!, अशा शब्दांत माजी खासदार आणि काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी आपला संताप व्यक्त केला.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र या निर्बंधांमुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान होत असल्याने हे निर्बंध मागे घेण्यात यावेत, या मागणीसाठी स्थानिक हाॅटेल-रेस्टाॅरंट मालकांनी दुपारी ओशिवरा पोलीस स्टेशनजवळ आंदोलन केलं. या आंदोलनात संजय निरूपम सहभागी झाले होते.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय निरूपम यांनी कडक निर्बंधांवरील आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले, मुद्दा केवळ एवढाच आहे की आपल्याला कोरोनाशी (coronavirus) मुकाबला करायचा आहे. या बाबीला कुणीही नाकारत नाही. परंतु लढण्यासाठी जगणंही महत्त्वाचं आहे. ज्या प्रकारे वेगवेगळे निर्बंध लादून धंदे बंद केले जात आहेत, त्यामुळे बेरोजगारी पुन्हा वाढेल, व्यवसाय उद्ध्वस्त होईल, पूर्ण अर्थव्यवस्था चौपट होईल आणि लोकांवर उपासमारीची वेळ येईल. मागच्या लाॅकडाऊनमुळे लोकं इतके उद्ध्वस्त झालेत की त्यातून अजूनही सावरलेले नाहीत. 

हेही वाचा- महाराष्ट्रात १५ एप्रिलपर्यंत निर्बंध, ‘अशी’ आहे नाईट कर्फ्यूची वेळ...

आता कोरोनाच्या नावाखाली जो तमाशा सुरू आहे, तो तात्काळ बंद झाला पाहिजे. लाॅकडाऊनची काहीही गरज नाही. सावधगिरी बाळगण्यासाठी रेस्टाॅरंट मालकही तयार आहेत. मुंबईचे सर्वसामान्य नागरिकही तयार आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातील व्याख्या तयार करा, लोकांना समजावून सांगा, हाॅटेल-रेस्टाॅरंट, कारखाने, व्यवसाय सुरू राहावेत, याचा विचार सरकारने केला पाहिजे. मागच्या वेळी जेव्हा लाॅकडाऊन लावण्यात आला होता, तेव्हा मुंबईतील स्थलांतरीत मजुरांना नाईलाजाने पळावं लागलं. कोणी पायी चालत, कुणी सायकलवरून, कुणी ट्रकमध्ये घुसून, पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाल्यास लोकांना बेरोजगार होऊन गावी जावं लागू शकतं. हे मुंबईच्या अर्थव्यवस्थेसाठी योग्य नाही, असं मत संजय निरूपम यांनी व्यक्त केलं. 

काँग्रेस (congress) सरकारचा एक भाग असूनही तुम्ही अशी मागणी कशी काय करता? या प्रश्नावर संजय निरूपम म्हणाले, काँग्रेसकडून मी अशी मागणी करतोय की सरकारने आमचं म्हणणं ऐकावं, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी यांचा त्रास जाणून घ्यावा. लाॅकडाऊनची धमकी देण्याऐवजी कोरोनाबाबतची सावधगिरी बाळगण्यासाठी नवीन प्रोटोकाॅल तयार करावेत. 

कोरोनाचा विषाणू रात्रीच्या वेळी जास्त वेगाने पसरतो की दिवसा हे मला ठाऊक नाही. रात्रीच्या ८ ते ११ वाजेदरम्यान हाॅटेल-रेस्टाॅरंट बंद ठेवणं म्हणजे त्यांचा व्यवसाय ठप्प करणे. तुम्हाला बार, वाईन शाॅप या वेळेत बंद करायचे तर करा, पण सामान्य रेस्टाॅरंट या वेळेत बंद करणं म्हणजे त्यांची रोजीरोटी बंद करणं, हा एकप्रकारे अन्यायच आहे, असं संजय निरूपम म्हणाले.

(congress leader sanjay nirupam participates in a silent protest held by restaurant and hotel owners at oshiwara against lockdown in maharashtra)

 हेही वाचा- लोकांनी मानसिकता ठेवावी, कडक निर्बंधांबाबत राजेश टोपेंचं वक्तव्य

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा