Advertisement

तर, मातोश्री समोरही फेरीवाले बसवू, नितेश राणे यांचा इशारा


तर, मातोश्री समोरही फेरीवाले बसवू, नितेश राणे यांचा इशारा
SHARES

फेरीवाल्यांच्या नावाखाली शिवसेना पक्षप्रमुख गलिच्छ राजकारण करत आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या निवास्थानाबाहेर फेरीवाल्यांना जाणीवपूर्वक बसवलं जात आहे. हे राजकारण थांबवलं नाही, तर मातोश्रीबाहेर फेरीवाल्यांना बसवू, असा इशारा काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.


फेरीवाला झोनवरून वाद

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरासमोरील आणि मागील अशा दोन्ही रस्त्यांवर २० फेरीवाल्यांसाठी मुंबई महापालिकेने जागा निश्चित केली आहे. एम. बी राऊत मार्ग आणि केळूस्कर मार्ग अशी या दोन रस्त्यांची नावं असून सध्या या दोन्ही रस्त्यावर एकही फेरीवाला बसत नाही. याचप्रकारे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या घरासमोरही 'फेरीवाला झोन', तयार केल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला.


हरकती, सूचना करू

अनधिकृत फेरीवाल्यांचा आम्ही विरोध करू म्हणून फेरीवाल्यांना आमच्या घरासमोर बसवलं जात आहे. याबाबत आम्ही आमची आयुधं वापरू. हरकती सूचनांच्या माध्यमातून हा डाव हाणून पाडू. त्यानंतरही हे रस्ते 'ना फेरीवाला क्षेत्रा'त न गेल्यास मातोश्री बाहेरही फेरीवाले बसतील, हे त्यांनी विसरू नये, असं राणे यावेळी म्हणाले.


फार्स नको, खरी कारवाई करा

कमला मिलमधील आगीच्या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. यावेळी नितेश राणे यांनी कमला मिलमधील प्रत्येक व्यवहारात गँगस्टर बाळा खोपडे हाच सहभागी असल्याचा आरोप केला. त्यामुळे या चौकशी अहवालात बाळा खोपडेचं नाव टाकण्यात यावं, अशी मागणी केली. याबाबत आयुक्तांना आपण पुरावेही दिल्याचं त्यांनी सांगितलं.

या दुर्घटनेनंतर हॉटेल आणि पबवर जी कारवाई सुरु आहे, तो केवळ फार्सच असल्याचा आरोपही त्यांनी केला. महापालिकेने ज्या ज्या हॉटेल्स आणि पबवर कारवाई केली आहे, ते सर्व दुसऱ्या दिवशी सुरू झाले आणि तोडलेल्या ठिकाणी पुन्हा बांधकाम करण्यात आलं.


हुक्का पार्लर बिनधास्त

एवढी मोठी घटना होऊनही महापालिकेची भीती हुक्का पार्लरला राहिलेली नाही, हे मी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आहे. आज देखील फायर सेफ्टी नियम कोणी पाळत नाही. ही बाब आयुक्तांच्या लक्षात आणून ही कारवाई अधिक कडक करावी, ती फार्स नसावी असं सांगितलं आहे. त्यामुळे विभागाच्या सहायक आयुक्तांना निलंबित करण्याची मागणीही आपण केल्याचं राणे यांनी सांगितलं.



हेही वाचा-

'फेरीवाला झोन'वर सूचना-हरकती नोंदवा! राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा