या समस्या कधी सोडवणार?

 Mumbai
या समस्या कधी सोडवणार?

क्रॉस रोड – रस्त्यांच्या समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी दुपारी मोर्चा काढला. धारावीतल्या क्रॉस रोड इथे हा मोर्चा काढला. या वेळी जी नॉर्थचे प्रभाग समिती सदस्य भास्कर शेट्टी यांच्यासह काँग्रेसचे 100 कार्यकर्ते आणि 100 ते 150 शाळकरी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यापूर्वी रस्त्यावर वर्षभर वाहणाऱ्या शौचालय आणि गटाराच्या सांडपाण्याची विल्हेवाट लावावी आणि रस्त्यावर असलेले खड्डे बुजवावे असं निवेदन महापालिकेला देण्यात आलं होतं, 1 ऑक्टोबरपासून रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरूवात होईल असं महापालिकेनं सांगितल होतं, पण अजूनही दुरुस्तीचं काम सुरु झालेलं नाही, असं भास्कर शेट्टी म्हणाले. वर्षा गायकवाड यांनी मोर्चातील भाषणानंतर क्रॉस रोडवरील एका खड्ड्याभोवती रांगोळी काढून पणत्या लावल्या.

Loading Comments