छठपूजा कार्यक्रमात काँग्रेसची बाजी

जुहू - मुंबईमध्ये सध्या पालिका निवडणूकीचे वारे वाहू लागलेत. हीच मुंबई पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक पक्षानं कंबर कसलीय. मात्र उत्तर भारतीयांची एकगठ्ठा मतं आपल्या पारड्यात कशी पाडली जातील यासाठी भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार स्पर्धा सुरू झालीय. आणि याची सुरुवात झालीय ती छठ पूजेच्या कार्यक्रमातून.

जुहू चौपाटीवर आयोजित करण्यात आलेल्या दोन्ही पक्षाच्या या छटपुजेच्या कार्यक्रमात खऱ्या अर्थानं बाजी मारली ती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्या कार्यक्रमानं. भोजपूरी गाणी, विविध कार्यक्रम यामुळं निरूपम यांनी गर्दी जमा करण्यात यश मिळवलंय. तर दुसरीकडे छटपुजेचा गाजावाजा करणाऱ्या भाजपच्या कार्यक्रमाला मात्र उत्तर भारतीयांनी फारसा प्रतिसाद दिला नसल्याचं प्रकर्षानं जाणवलं.

छठपुजेच्या कार्यक्रमातून काँग्रेस आणि भाजपनं उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय खरा, मात्र या पूजेचा लाभ कोणाला मिळणार याचं उत्तर मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या निकालानंतर मिळेल. 

Loading Comments