आघाडीचं सबुरीचं धोरण, युतीच्या जागावाटपाकडे नजर

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जागा वाटपाचा फाॅर्म्युला ठरला असला, तरी उमेदवारांची नावं घोषित करण्यास आघाडीकडून थोडा वेळ घेतला जात आहे.

SHARE

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जागा वाटपाचा फाॅर्म्युला ठरला असला, तरी उमेदवारांची नावं घोषित करण्यास आघाडीकडून थोडा वेळ घेतला जात आहे. कारण युतीच्या जागावाटपानंतरच उमेदवार घोषित करण्याची रणनिती आघाडीने आखली आहे.  

बंडखोरीची शक्यता

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाचं पारडं जड मानलं जात आहे. या दोन्ही पक्षांत सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील आयात नेत्यांची मेगाभरती सुरू आहे. या नेत्यांना तिकीट देताना शिवसेना-भाजपातील विद्यमान आमदारांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांतील नेते बंडखोरी करू शकतात. असे काही नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्याच्या संपर्कात असल्याचंही म्हटलं जात आहे.  

उमेदवारांना हेरणार

त्यामुळे युतीच्या माध्यमातून राज्यातील कुठल्या विधानसभा मतदारसंघात कुठल्या उमेदवाराला तिकीट देण्यात येईल, ते बघून आघाडीतर्फे उमेदवार रिंगणात उतरवण्यात येतील. यामध्ये विद्यमान आमदारांसोबत, युतीतील बंडखोर आमदार आणि नवीन चेहऱ्यांचा देखील समावेश असेल. आघाडीच्या या रणनितीनुसार काँग्रेस- राष्ट्रवादी विधानसभा मतदारसंघनिहाय नावांची यादी तयार करण्यात येईल.हेही वाचा-

सावरकर पंतप्रधान असते, तर पाकिस्तान जन्मालाच आला नसता- उद्धव ठाकरे

हेच पळपुटे, कुठून तरी तुमच्या तंबूत शिरले होते, शिवसेनेची पवार यांच्यावर टीकासंबंधित विषय
ताज्या बातम्या