शिवडीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निषेध

 Sewri
शिवडीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निषेध
शिवडीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निषेध
शिवडीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निषेध
See all

शिवडी - खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडर आणि डायरीवर महात्मा गांधींऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र छापल्याचा काँग्रेसने विरोध केलाय. आचार्य दोंदे मार्गावर काँग्रेसच्या वतीने रविवारी याचा निषेध करण्यात आला. ग्रामोद्योगच्या कॅलेंडर आणि डायरीवरून पतंप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र हटवावे अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलीय. नाहीतर तीव्र आंदोलन करून ठिकठिकाणी मोदींचा पुतळा जाळण्यात येईल, अशी आक्रमक भूमिकाही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलीय.

Loading Comments