Advertisement

'मद्यपुरवठा करून सरकार काय संदेश देऊ इच्छिते'


'मद्यपुरवठा करून सरकार काय संदेश देऊ इच्छिते'
SHARES

नरिमन पॉंइंट - कोल्ड प्ले या कार्यक्रमात मद्यपुरवठा करण्याकरता राज्य सरकारनं परवानगी देण्याची मागणी आयोजकांनी केली आहे. याबाबत सरकारने तात्काळ भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. गांधीभवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ग्लोबल सिटीझन इंडिया या संस्थेतर्फे मुंबईमध्ये 19 नोव्हेंबर रोजी कोल्ड प्ले कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. गरिबी निर्मूलन आणि युवकांना सामाजिक कार्याची प्रेरणा देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. जगामध्ये ग्लोबल सिटीझनतर्फे असे कार्यक्रम या अगोदर ज्या देशात झाले, त्या देशातील सरकारांनी आयोजक अथवा भागीदार म्हणून सहभाग घेतला नव्हता. मात्र महाराष्ट्र सरकारने सहआयोजक म्हणून भूमिका वठवून या संस्थेवर मेहेरबानी करण्याचं सत्र चालवले आहे. असंही सावंत म्हणाले.
महाराष्ट्र सरकारनं एमएमआरडीएचं मैदान अण्णा हजारे यांच्या आंदोलनालाही सवलतीच्या दरात दिलं नव्हतं, यात शासन सहभागी आहे, असं दाखवून या कार्यक्रमासाठी मैदानाच्या भाड्यात 75 टक्के सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर करमणूक करही माफ करण्यात आला आहे. आता या संस्थेनं कार्यक्रमस्थळी मद्यपुरवठा आणि मद्यपानासाठी परवानगी मागितली आहे. राज्य सरकार सहआयोजक असलेल्या या कार्यक्रमात मद्यपान झाले तर कोणती सामाजिक प्रेरणा आणि आदर्श युवकांना मिळेल याबाबत सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे स्पष्टीकरण मागितलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा