Advertisement

पतंगराव कदम 'आयसीयू'त, लीलावती रुग्णालयात उपचार सुरू


पतंगराव कदम 'आयसीयू'त, लीलावती रुग्णालयात उपचार सुरू
SHARES

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आल्याचं कळत आहे.


 

शनिवारी म्हणजे ३ मार्च रोजी कदम यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांचे मूत्रपिंड काम करत नसल्याने अतिदक्षता विभागा(आयसीयू) तील व्हेंटिलेटरवर त्यांना ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. लीलावतीतील डॉ. एम. बी. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या पतंगराव कदम यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शिवाय ते गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून आजारी असल्याचं सांगण्यात येत होतं. सोशल मीडियावरही कदम यांची प्रकृती बिघडल्याच्या पोस्ट व्हायरल होत होत्या. त्यानंतर त्यांचे चिरंजीव विश्वजीत कदम यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून पतंगराव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं म्हटलं होतं. 



हेही वाचा-

मनोहर पर्रिकर पुन्हा लीलावतीत, पुढील उपचारांसाठी अमेरिकेत जाण्याची शक्यता



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा