Advertisement

‘याला म्हणतात अकलेचे दिवे लावणं’, काँग्रेसची भाजपवर 'अशीही' टीका

याला म्हणतात अकलेचे दिवे लावणं, असा टोमणा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (congress spokesperson sachin sawant) यांनी लगावला.

‘याला म्हणतात अकलेचे दिवे लावणं’, काँग्रेसची भाजपवर 'अशीही' टीका
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm narendra modi) यांनी केलेल्या आवाहनानुसार संपूर्ण देशभरातील लोकांनी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील दिवे बंद करून दिपप्रज्वलन केलं. त्याचे असंख्य फोटो, व्हिडिओ भाजप (bjp) नेत्यांकडून व्हायरल होत आहेत. असाच एक फोटो भाजपच्या मुंबईतील नेत्याने सोशल मीडियावर टाकला होता. त्याला उद्देशून याला म्हणतात अकलेचे दिवे लावणं, असा टोमणा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (congress spokesperson sachin sawant) यांनी लगावला.

चुकीचा फोटो

दिप प्रज्वलनानंतर आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट करत भाजपचे आमदार अतुल भातखळकर (bjp mla atul bhatkhalkar) यांनी म्हटलं होतं की, 'हसणाऱ्यांचे दात घशात घालत देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला जबरदस्त प्रतिसाद दिला. कोरोनाच्या अंध:कारात आशेचा दिवा प्रज्वलित केला. कोरोना संकटाच्या विरोधात देश एकजूट होऊन उभा राहिला. हे पहा अवकाशातून उपग्रहानं टिपलेलं छायाचित्र,' असं म्हणत त्यांनी उपग्रहातून टिपलेला भारताचा एक फोटोही पोस्ट केला होता. परंतु हा फोटो जुना असल्याने ट्रोलर्सनी त्यांच्यावर ट्रोलिंग सुरू केलं. आपली चूक लक्षात आल्यावर भातखळकर यांनी हे ट्विट ताबडतोब डिलिट केलं. 

हेही वाचा - जितेंद्र आव्हाड यांची पंतप्रधानांवर पुन्हा टीका, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

मूर्ख बनवण्याचा उद्योग

तोच धागा पकडताना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत त्यांना उद्देशून म्हणाले, हा हा हा! जंगलात, दऱ्या खोऱ्यात, पर्वत रांगांमध्येपण दिवे लागले बरं! प्राण्यांना पण दिवे पोहोचविले होते का? अकलेचे दिवे लावणे याला म्हणतात. देशाला मूर्ख बनविण्याचा उद्योग भाजपचे लोक करत आहेत. जागे व्हा!

आव्हाड यांची टीका

दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) यांनी रात्री ९ वाजताचा महाड इथल्या चवदार तळ्याचा फोटो ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) निशाणा साधला आहे. संकटाशी लढताना अंधार दूर लोटायचा असतो. ज्ञानसूर्य (डॉ.बाबासाहेब आंबेडकर) तेव्हाही तळपत होताच... आजही तळपतोच आहे. महाडची परंपरा कायम, #जय_भीम #अब_आगे_क्या? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

हेही वाचा- देशाला इव्हेंटची नाही, इलाजाची गरज, बाळासाहेब थोरातांची मोदींवर टीका

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठवली होती. हे टीकेचं सत्र अजूनही सुरूच आहे. 


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा