Advertisement

नोटाबंदीविरोधात काँग्रेसचं आंदोलन


नोटाबंदीविरोधात काँग्रेसचं आंदोलन
SHARES

सीएसटी - मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी नोटा बदलीच्या निर्णयावर टीका केलीय. "चलनाबाबतचे सर्व निर्णय यापूर्वी भारतीय रिर्झव्ह बॅक घेत होती. आता सरकार निर्णय घेत आहे. हे चूकीचे आहे," अशी प्रतिक्रीया निरूपम यांनी दिली. "नोटा बंदीबाबत काँग्रेस मुंबईत 22 नोव्हेंबरपासून ठिकठिकाणी बँकांच्यासमोर आंदोलन करणाराय. सिटीजन प्रोटेस्ट मार्चचंही आयोजन करणाराय," असं निरूपम यांनी स्पष्ट केलं.
"2000 रूपायांच्या नोटा सरकारनं चलनात का आणल्या याबाबत सरकार अजून खुलासा का करत नाही? मुबलक नोटा उपलब्ध होण्यासाठी सात महीन्याचा कालावधी लागणाराय. 2000 रुपायांच्या नोटा चलनात आल्यावर भाजप प्रणीत तीन राज्यामध्ये सदरच्या नोटा लाचच्या स्वरूपात घेण्याच्या घटना घडल्यात," असा आरोप निरूपम यांनी केला. "मोदींनी लोकसभा निवडणूक कॅम्पेनसाठी 2500 करोड पैसे खर्च केल्याचं आंतरराष्टीय यंत्रणा सांगतेय. सदरचा पैसा त्यांनी कुठून आणला? दोन हजार पेक्षा जास्त धनराशी ज्या पक्षांनी घेतली त्याचा अहवाल निवडणूक आयोगाला देणं बंधनकारक आहे. सर्व पक्षांनी अहवाल सादर केले परंतु भाजपानं 2014 पासून अहवाल सादर केला नाही," असं निरूपम यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा