Advertisement

मुंबईत पुढचा महापौर काँग्रेसचाच- भाई जगताप

येऊ घातलेल्या मुंबई महापालिकेच्या (bmc) निवडणुकीनंतर मुंबईत काँग्रेसाचाच महापौर विराजमान होईल, असा पुनरूच्चार मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला. मुंबई काँग्रेसच्या ईशान्य मुंबई जिल्ह्यातील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

मुंबईत पुढचा महापौर काँग्रेसचाच- भाई जगताप
SHARES

येऊ घातलेल्या मुंबई महापालिकेच्या (bmc) निवडणुकीनंतर मुंबईत काँग्रेसाचाच महापौर विराजमान होईल, असा पुनरूच्चार मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला. मुंबई काँग्रेसच्या ईशान्य मुंबई जिल्ह्यातील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 

कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन करताना भाई जगताप म्हणाले, काँग्रेसचे कार्यकर्ते ही पक्षाची खरी ताकद आहे. या कार्यकर्त्यांनी वर्षभरात महापालिका निवडणुकांसाठी आपली सर्व शक्ती एकवटून काम केल्यास २०२२मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर मुंबईमध्ये काँग्रेसचाच महापौर असेल. 

काँग्रेसने मुंबईत स्वबळावर लढण्याचं ठरवलं आहे. म्हणजेच इतर कुठल्याही पक्षासोबत आघाडी न करता काँग्रेस (congress) मुंबईतील २२७ वाॅर्डात आपले उमेदवार उभे करणार आहे. प्रत्येक वाॅर्डात पक्षाकडून उभा करण्यात येणारा उमेदवार हा स्थानिक कार्यकर्त्यांपैकीच एक असेल. कोणी कितीही सांगितलं, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी वॉर्डामध्ये बाहेरच्या उमेदवाराला तिकीट दिलं जाणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असं आश्वासन भाई जगताप (bhai jagtap) यांनी कार्यकर्त्यांना दिलं.  

हेही वाचा- म्हणून शेतकरी शिष्टमंडळाला भेटलो नाही, राज्यपालांचा खुलासा

सर्वसामान्य मुंबईकरांना (mumbai) असंख्य प्रश्न भेडसावत आहेत, झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीबांना पक्क्या घरांची गरज आहे, सर्वांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळालं पाहिजे, घनकचरा, आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. स्थानिक पातळीवरच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे, असे निर्देश भाई जगताप यांनी कार्यकर्त्यांना दिले.

सत्ताधारी पक्षाने मुंबईकरांना ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात पूर्णपणे माफी देण्याचं आश्वासन दिलेलं होतं. मात्र हे आश्वासन अजूनही पूर्ण झालेलं नाही. त्याचा पाठपुरावा करतानाच काँग्रेसच्या २९ नगरसेवकांसोबत मुंबईकरांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहे. त्यांना नुसतं निवेदन देऊन गप्प बसणार नाही, तर त्यावर कृती करायला प्रशासनाला भाग पाडणार, असा दावा भाई जगताप यांनी केला.

(congress will choose next mayor of mumbai bmc says bhai jagtap)

हेही वाचा- पर्यटनाला चालना देण्यासाठी २ हजार ९०५ कोटींचे करार


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा