Advertisement

'इंदू सरकार' काँग्रेसच्या निशाण्यावर


'इंदू सरकार' काँग्रेसच्या निशाण्यावर
SHARES

गेल्या अनेक दिवसांपासून वादात अडकलेला मधुर भंडारकर यांचा हिंदी चित्रपट 'इंदू सरकार' आता काँग्रेसच्या निशाण्यावर आहे. या चित्रपटाविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी मुलुंडमध्ये निदर्शने केली. चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पात्र चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी 'इंदू सरकार' या चित्रपटाचे पोस्टर जाळले. 

या चित्रपटाचे दिग्दर्शक मधुर भंडारकर यांच्या विरोधात देखील तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. 'इंदू सरकार'मध्ये काँग्रेस पक्षासाठी नेहमीच वंदनीय प्रतिक असलेल्या इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय गांधी तसेच काँग्रेसच्या इतर काही जेष्ठ नेते मंडळींचं नकारात्मक सादरीकरण केल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी याचा निषेध केला. सोबतच दिग्दर्शक मधुर भंडारकर आणि चित्रपटाच्या पोस्टरचे दहन केले. चित्रपटाच्या प्रदर्शनास सिनेमागृहांमध्ये बंदी घालण्यात यावी, अशी मागणी देखील यावेळी काँग्रेसतर्फे करण्यात आली.

'मधुर भांडारकर हे भाजपाचेच चमचे' अशी खोचक टीका काँग्रेसचे मुंबई सरचिटणीस राजेश इंगळे यांनी केली आहे. 'सदर चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करणाऱ्या थिएटरमध्ये देखील काँग्रेस कार्यकर्ते प्रदर्शन करून शो बंद पाडतील, त्यामुळे सिनेमागृहाच्या मालकांनी सदर चित्रपट आपल्या थियेटरमध्ये चालवू नये', असा इशारा यावेळी काँग्रेसचे ईशान्य मुंबईचे सरचिटणीस राजेश इंगळे यांनी दिला.



हेही वाचा -

'इंदू सरकार'वर बोंबाबोंब, मधुर भंडारकरला काळे फासण्याची मागणी


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा