Advertisement

अॅट्राॅसिटी कायदा शिथिल करण्यामागे षडयंत्र- आठवले

कोपर्डी प्रकरणानंतर मराठा-दलित समाजात रोष वाढला होता. काही समाजाने त्याला खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला. त्यातून अॅट्राॅसिटीचा मुद्दा लावून धरण्यात आला होता. यामागे काहीजणांचं षडयंत्र असल्याचं आठवले म्हणाले.

अॅट्राॅसिटी कायदा शिथिल करण्यामागे षडयंत्र- आठवले
SHARES

अॅट्राॅसिटीा कायद्यातील नियम शिथिल करण्यामागे काही जणांचं षडयंत्र असल्याचं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी स्पष्ट केलं. अॅट्राॅसिटीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आठवले यांनी हे वक्तव्य केलं. 

काय म्हणाले आठवले?

कोपर्डी प्रकरणानंतर मराठा-दलित समाजात रोष वाढला होता. काही समाजाने त्याला खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला. त्यातून अॅट्राॅसिटीचा मुद्दा लावून धरण्यात आला होता. यामागे काहीजणांचं षडयंत्र असल्याचं आठवले म्हणाले.

पुनर्विचार याचिका

अॅट्राॅसिटीअंतर्गत दाखल केलेले ९० टक्के खटले खोटे असतात या सर्वोच्च न्यायालयाच्या मताशी आम्ही सहमत नाही. त्यामुळे आम्ही या प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार आहोत, असं आठवले म्हणाले.

अटक झालीच पाहिजे

कोरेगाव-भीमा प्रकरणातील आरोपी संभाजी भिडे असो किंवा इतर कुणीही असो, त्यांना अटक झाली पाहिजे. हिंसाचारात सहभागी तरुणांना पोलिसांनी पकडलेलं आहे. त्यांच्या चौकशीतून वस्तुस्थिती समोर येईल, अशी अापली अपेक्षा असल्याचं आठवले यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा-

आंबेडकरांच्या मोर्चाला पाठिंबा नाही- रामदास आठवले

संभाजी भिडे मोकाट का? विरोधकांचा सवाल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा