Advertisement

आंबेडकरांच्या मोर्चाला पाठिंबा नाही- रामदास आठवले

२६ मार्चला निघणारा मोर्चा हा प्रकाश आंबेडकर यांचा आहे. कारण भिडेंच्या अटकेसाठी मोर्चा काढायचा होताच, तर सर्व गटांशी चर्चा करायला पाहिजे होती. परंतु आंबेडकर यांनी आमच्याशी वा इतर गटांशीही चर्चा केलेली नाही, त्यामुळे हा मोर्चा प्रकाश आंबेडकर यांचा असल्याचंही त्यांनी म्हटलं.

आंबेडकरांच्या मोर्चाला पाठिंबा नाही- रामदास आठवले
SHARES
Advertisement

कोरेगाव-भीमा दंगलीतील प्रमुख आरोपी संभाजी भिडे यांना अटक व्हावी, या मागणीसाठी २६ मार्च रोजी काढण्यात येणाऱ्या एल्गार मोर्चात रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) सहभागी होणार नाही हे शनिवारी स्पष्ट झालं. कारण हा मोर्चा प्रकाश आंबेडकर यांनी काढला असून या मोर्चासंबंधी आरपीआय (ए) सोबतच त्यांचं काहीही बोलणं झालेलं नाही. त्यामुळे आपला या मोर्चाला पाठिंबा नसल्याची भूमिका आरपीए (ए)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडली.


भिडेंना अटक करा

भिडेंच्या अटकेसाठी सोमवारी २६ मार्चला सकाळी १० वाजता भायखळा ते आझाद मैदान असा 'एल्गार मोर्चा' काढण्यात येणार आहे. या मोर्चाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळण्याची शक्यता असताना आठवले यांनी मात्र आपला पक्ष या मोर्चात सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. एवढंच नाही, तर कोरेगाव-भीमा दंगलीला जे जबाबदार आहेत, त्यांना अटक झालीच पाहिजे. कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही त्यामुळे भिडेंना लवकरात लवकर अटक करा, हिच आमची मागणी असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.


चर्चा करायची होती

२६ मार्चला निघणारा मोर्चा हा प्रकाश आंबेडकर यांचा आहे. कारण भिडेंच्या अटकेसाठी मोर्चा काढायचा होताच, तर सर्व गटांशी चर्चा करायला पाहिजे होती. परंतु आंबेडकर यांनी आमच्याशी वा इतर गटांशीही चर्चा केलेली नाही, त्यामुळे हा मोर्चा प्रकाश आंबेडकर यांचा असल्याचंही त्यांनी म्हटलं.


अॅट्राॅसिटीवर पुनर्विचार याचिका

सर्वोच्च न्यायालयानं अॅट्राॅसिटी कायद्याबाबत नुकताच महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या निर्णयामुळे अॅट्राॅसिटी कायदा संपुष्टात आल्याचं म्हणत सर्वसामान्यांकडून या निर्णयाबाबत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयावर पुनर्विचार होण्याची गरज व्यक्त होत असताना आरपीआय त्यासाठी पुढं आलं आहे. लवकरच यासंबंधी आरपीआयकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही आठवले यांनी दिली.


मोदींची वाह वाह... काँग्रेसवर आगपाखड

अॅट्राॅसिटीबाबत काँग्रेस राजकारण करत असून हा राजकीय खेळ काँग्रेसने थांबवावा. काँग्रेसकडून केंद्रावर जी टीका होत आहे ती चुकीची आहे, असं म्हणत आठवले यांनी काँग्रेसवर आगपाखड केली. तर दुसरीकडे आठवलेंनी मोदींचं कौतुकही केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा केंद्र सरकार अभ्यास करत असून या निर्णयाला आव्हान देणार असल्याचं सांगितलं. एवढंच नाही, तर मोदी अनुसूचित जाती-जमातींच्या हितासाठी दक्ष असल्याचंही आठवलेंनी म्हटलं.हेही वाचा-

मोदी दंगलखोरांच्या पाठिशी, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी आरोप

शरद पवार जातीयवादी-अॅड. प्रकाश आंबेडकरसंबंधित विषय
Advertisement