Advertisement

‘मुंबईला आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्याचा प्रयत्न’

कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईला आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्याचा घाट काही जणांकडून घातला जात असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

‘मुंबईला आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्याचा प्रयत्न’
SHARES

कोरोनावर यशस्वीरीत्या मात करून घरी परतलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (housing minister jitendra awhad) सोशल मीडियावर पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईला आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्याचा घाट काही जणांकडून घातला जात असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. 

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची (corona patient in maharashtra) संख्या २२ हजार १७१ वर जाऊन पोहोचली असून त्यातील ८३२ कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या १३,७३९ वर गेली असून त्यातील ५०८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील वरळी, धारावी, वडाळा, दादर, अशा अनेक परिसरांत कोरोनाबाधितांची वाढती संख्या प्रशासनाच्या चिंतेचा विषय ठरत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनीही महाराष्ट्रातील स्थितीविषयी चिंता व्यक्त केली आहे. 

हेही वाचा - जितेंद्र आव्हाडांची कोरोनावर मात, ठणठणीत बरे होऊन परतले घरी

महाराष्ट्रात विशेषकरून मुंबईत कोरोनाला आळा घालण्यात प्रशासनाला यश येत नसल्याने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर (maha vikas aghadi government) विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. कोरोनाच्या लढ्यात सरकार अपयशी ठरत असल्याने मुंबईतील सूत्रे केंद्र सरकारने आपल्या हाती घ्यावीत, असंही काही जण म्हणत आहेत. तर मुंबईत लष्कराला पाचारण करण्यात येणार, अशा अफवा देखील अध्येमध्ये पसरत आहेत.

यावर भाष्य करताना जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटर हँडलवर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईला बदनाम करण्याचा कट पद्धतशीरपणे रचला जात आहे, हे दिसून येतंय आणि मुंबईचा लचका तोडण्यासाठी टपून बसलेले लोक अजूनही या देशात आहेत आणि त्यांचं घर आपल्या बाजूलाच आहे, अशा शब्दांत आव्हाड यांनी विरोधकांना अप्रत्यक्षपणे टोमणा मारला आहे. 

दरम्यान,  कोरोनावर मात करून रविवारी सुखरुपरित्या घरी पोहोचले. कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी झाला असून परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच जोमात पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया, असं म्हणत आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत केलं.

हेही वाचा - अभियंता मारहाण प्रकरण: जितेंद्र आव्हाडांना झटका, हायकोर्टाचे सीसीटीव्ही फुटेज घेण्याचे निर्देश

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा