Advertisement

जितेंद्र आव्हाडांची कोरोनावर मात, ठणठणीत बरे होऊन परतले घरी

राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड कोरोनावर मात करून रविवारी सुखरुपरित्या घरी पोहोचले आहे.

जितेंद्र आव्हाडांची कोरोनावर मात, ठणठणीत बरे होऊन परतले घरी
SHARES

राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड कोरोनावर मात करून रविवारी सुखरुपरित्या घरी पोहोचले आहे. कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी झाला असून परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच जोमात पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया, असं म्हणत आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत केलं.

कसा झाला कोरोना?

लाॅकडाऊनमुळे (lockdown) अडचणीत आलेल्या कळवा-मुंब्रा परिसरातील रहिवाशांसाठी आव्हाड यांच्यामार्फत ‘कम्युनिटी किचन’ चालवण्यात येत होतं. तसंच त्यांना दैनंदिन उपयोगाच्या जीवनावश्यक वस्तू, धान्य देखील वाटण्यात येत होतं. त्यातच आव्हाड यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या ताफ्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट होताच आव्हाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोना चाचण्या (corona test) केल्या होत्या. तर खबरदारीचा उपाय म्हणून आव्हाड यांनी स्वत:चं विलगीकरण करून घेतलं होतं. 

मात्र श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना आधी तातडीने ज्युपिटर रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु तिथं प्रकृती खालावल्याने त्यांना मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं त्यांची कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आल्यावर त्यांच्यावर कोरोनाचे उपचार करण्यात आले. 

हेही वाचा - काॅंग्रेस, राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ उमेदवार, शिवसेना नाराज?

स्वत: दिली माहिती

त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी रविवार १० मे रोजी स्वत: ट्विट करून आपण बरे झाल्याची माहिती दिली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी पुढील एक महिना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला आहे. त्यामुळं कुणीही भेटायला येऊ नये. महिनाभराच्या विश्रांतीनंतर मी आपल्या सोबत असेन,' असं त्यांनी म्हटलं आहे.  

आव्हाड यांनी फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय आणि इतर सर्व हॉस्पिटल स्टाफ या सर्वांचे आभार देखील मानले आहेत. यापुढेही तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असेच राहू द्या. परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच जोमात पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया, असं म्हणत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही प्रोत्साहीत केलं आहे.

आव्हाड यांच्यासोबतच कोरोनाची लागण झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे हे देखील कोरोनावर यशस्वीरित्या मात करूनघरी परतले आहेत.

हेही वाचा - मजुरांना का घेतलं जात नाहीय त्यांच्याच राज्यात? वाचा, बाळासाहेब थोरात काय म्हणाले...

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा