Advertisement

हे आघाडी सरकार की वाधवान सरकार?, देवेंद्र फडणवीसांचा सवाल

वाधवान प्रकरणाची संपूर्ण चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (bjp leader devendra fadnavis) यांनी केली आहे.

हे आघाडी सरकार की वाधवान सरकार?, देवेंद्र फडणवीसांचा सवाल
SHARES

वाधवान बंधूंना संचारबंदीच्या काळातही विशेष परवानगीचं पत्र देत मुंबईहून महाबळेश्वरला प्रवास करण्याची मुभा देणारे गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता (special principal secreatery amitabh gupta) पुन्हा सेवेत रुजू झालेले असताना या प्रकरणाची संपूर्ण चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (bjp leader devendra fadnavis) यांनी केली आहे. शिवाय हे महाविकास आघाडीचं सरकार आहे की वाधवान सरकार? असा सवाल देखील फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले फडणवीस?

लाॅकडाऊनच्या काळात सीबीआय आणि ईडीचा आरोप असलेले वाधवान बंधू यांना फिरण्याकरीता ट्रान्झिस्ट पास देणारे अमिताभ गुप्ता यांना पुन्हा एकदा त्याच जागी नियुक्त करण्यात आलं आहे. मी त्याही वेळेस सांगितलं होतं की, अशा प्रकारचा पास कुठलाही अधिकारी आपल्या भरवशावर देऊ शकत नाही. जोपर्यंत सरकारमधले किंवा सरकार चालवणारे प्रमुख लोकं अशा प्रकारे आशीर्वाद देत नाहीत, इशारा देत नाहीत किंवा आदेश देत नाहीत, तोपर्यंत असा पास दिला जाऊ शकत नाही. 

हेही वाचा - वाधवान बंधूंना शिफारस पत्र देणारे अमिताभ गुप्ता पुन्हा सेवेत हजर

ज्या गतीने त्यांना क्लिन चीट देण्यात आली आणि त्याच जागेवर पुन्हा नियुक्त करण्यात आलं, यातून हे स्पष्ट झालेलं आहे की याठिकाणी सरकारमधल्या किंवा सरकार चालवणाऱ्याच्या इशाऱ्यावरच वाधवान बंधूंना सवलतीचा पास देण्यात आला होता. माझा सवाल आहे की आघाडीचं सरकार आहे की वाधवान सरकार आहे? म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे की या संपूर्ण घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, असं फडणवीस म्हणाले.

केवळ समज

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. तसंच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अर्थ विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या समितीची नेमणूकही (inquiry committee) सरकारने केली होती. काही दिवसांपूर्वीच या प्रकरणाचा चौकशी अहवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांना सादर करण्यात आला होता.  

सरकारला लक्ष्य 

या चौकशी समितीसमोर साक्ष देताना वाधवान बंधूंना कुणाच्याही शिफारसीने नव्हे केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून विशेष पत्र दिल्याची कबुली अमिताभ गुप्ता यांनी दिली होती. या प्रकरणी गुप्ता यांना समज देण्यात आली असून भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी ताकीदही देऊन सोडण्यात आलं आहे. त्यामुळे ते पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. परंतु या प्रकारावर भाजपने हरकत घेतली असून यावरून ते पुन्हा एकदा सरकारला लक्ष्य करत आहेत.

हेही वाचा - वाधवान बंधूला पत्र देण्यासाठी प्रधान सचिवांवर दबाव नव्हता- अनिल देशमुख

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा